दिपक मापारी, रिसोड वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवर असलेल्या आसेगाव पेण येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात गेट टाकण्यास जलसंधारण विभागाला वेळ लागत आहे याबाबत पाटबंधारे विभागाने 15 ऑक्टोबर पर्यंत ची मुदत दिली होती परंतु मध्यंतरीच जलसंधारण विभागाने पत्र देऊन गेट टाकण्यास सांगितले परंतु संबंधित दोन्ही विभागाने शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष न देता केवळ आपल्या विभागाचा कारभार कसा चांगला चालू आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु शेतकऱ्याचा हित जपण्याचा दोन्ही विभागाचा असफल प्रयत्न त्यामधूनच शेतकऱ्याचा आर्थिक नुकसान कसा होईल या बाबीचा अंदाज न आल्यामुळे चुकीच्या वेळेस पाटबंधारे विभागाने गेट टाकणे व जलसंधारण विभागाने घेत न टाकणे हीच बाब शेतकऱ्याला आर्थिक अडचणीत आणणारी ठरत आहे त्यामुळे सध्या तरी परतीच्या पावसामुळे होणाऱ्या अवकाळी पावसामुळे व पेनटाकळी धरणातून पाणी सोडल्यामुळे पैनगंगेला पूर आला त्यामुळे आता तरी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देत त्यामधील पाणी सोडावे व त्याच वेळेस जलसंधारण विभागाने आसेगाव पेण येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात गेट टाकावे त्यामुळे आसेगाव पेन, देऊळगाव बंडा हिवरा पेन बेलखेडा व या बंधाऱ्यावरून शेतकऱ्यांना पाणी घ्यावे लागते व त्यामधून आपली शेती पिकवावी लागते अशा सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी पाटबंधारे विभाग व जलसंधारण विभाग या दोघांनी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या हितासाठी पाणी केव्हा आडवावे व कोणत्या वेळात अडवावे याबाबत समन्वय साधावा असे केल्यास शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल व शासनाने यासाठी हे विभाग कार्यरत केले ते कार्य शेतकऱ्यांच्या हिताचे असेल तरी दोन्ही विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करावे व असे गाव पेण येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात वरुड बॅरेजेस मधील पाणी कमी करून आसेगाव पेण येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात गेट टाकावे व गेट टाकणे झाल्यास वरून बॅरेजेसचे गेट बंद करावे यामुळे शेतकऱ्याचा फायदाच होणार आहे अशी मागणी शिवसेनेचे नेते नारायणराव यांनी शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे..
Users Today : 6