दिपक मापारी, रिसोड महाराष्ट्र शासनाने २००७ मध्ये माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती योजना अस्तित्वात आणली होती. या समितीने उल्लेखनीय कामगिरी बजावत तंटे, वादविवाद यावर नियंत्रण मिळवून एकोपा, शांततात व समारोपचाराने वातावरण राखण्यात यश प्राप्त केले होते..२०११ पासून मात्र या समित्यांची पीछेहाट सुरू होऊन शेवटची घर घर लागली आहे..तंटामुक्त गाव समित्यांची प्रभावी अंमलबजावणी संबंध राज्यभर झाली. महात्मा गांधींना अपेक्षित असलेले तंटामुक्त ग्राम निर्मा व्हावे, या उद्देशाने राज्यभर या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या समित्या मार्फत गाव स्तरावरील वाद, किरकोळ भांडणे गावातच मिटविण्याचे प्रयत्न गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, प्रतिष्ठित नागरिक यांच्यामार्फत यशस्वीरित्या झाले.किरकोळ प्रकरणामध्ये मध्ये स्थानी भूमिका घेऊन बरीच प्रकरणे वाढवण्याऐवजी तंटामुक्त ग्राम समितीच्या माध्यमाने त्यांच्यात समन्वयाची व समाजस्थाची भूमिका घेऊन वादात निपटारा करीत होती. याचा लेखाजोखाही काही काळ तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षाकडे लेखी स्वरूपात होता. त्याची पूर्णता करून तो पोलीस प्रशासनाकडे सुपुर्द करीत होते. उस्कृत काम करणाऱ्या गाव समित्यांना तालुका जिल्हा, स्तरावर बक्षीस योजनाही सुरू होती..बक्षीस योजनेमुळे गाव समिती सोबतच गावकऱ्यांमध्ये समितीच्या कार्याबाबत उत्साह राहत होता. माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या नंतर मात्र या योजनेला घर घर लागली. आजही त्याच समितीच्या नावाचे फलक अनेक ग्रामपंचायत कार्यालयात लटकत आहेत. दरवर्षी पोलीस प्रशासन तसा अहवाल शासनाला पाठविते. तालुकास्तरावर पोलीस प्रशासनाने शिफारस केलेली तालुका तंटामुक्ती समिती चे गठन करण्यात आलेले आहे. परंतु ती समिती केवळ कागदावरच आहे. तिला कोणतेही कार्य नाही नाही..बैठकीला बोलावतात फक्त पोलीस पाटील….गावातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याकरिता पोलीस पाटलांची नियमित बैठक पोलीस प्रशासन घेत असते. त्या प्रमाणात तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षांना महत्व दिले जात नाही. त्यामुळे गाव खेड्यातील तंटे कमी होण्याऐवजी किंवा गाव तंटामुक्त होण्याऐवजी गाव तंटायुक्त होत चाललेले आहे. पूर्वी याच समित्यामार्फत गावागावातील तंटे सोडविण्यात यश आलेले होते..नव्या स्वरूपात समित्या स्थापन करण्याची गरज….गाव जर खरंच तंटामुक्त व्हावे. अशी शासन, प्रशासन व राज्यकर्त्याची भूमिका असेल, तर पुन्हा गावागावात तंटामुक्त ग्राम समितीचे नवे स्वरूप निर्माण करणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासन, स्थानिक प्राधिकरण, याचा मेळ घालून प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, वन अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदी सर्वासमावेशक लोकांचा सहभाग घेऊन तंटामुक्त ग्राम समितीला लागलेल्या घर घर मधून मुक्त करण्याची गरज निर्माण झालेली आहे..
Users Today : 6