औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथे भारतीय डाक विभागाच्या वतीने दिनाक ०८.१०.२०२२ रोजी डाक महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी डाक विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती लोकांना दिली.आजच्या नवीन युगात डाक विभागाने कात टाकली असून , यांचे मार्फत विविध योजना चालवल्या जात असून लोकांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी पोस्टाच्या विविध योजना संदर्भात माहिती देण्यात आली , पोस्टाची बचत खाते, मासिक आवर्ती खाते , सुकन्या समृद्धी खाते,वरिष्ठ नागरिक बचत योजना,दरमहा आवर्ती बचत योजना, मुदत ठेव, पोस्टल जीवन विमा, ग्रामीण टपाल जीवन विमा इत्यादी. 0 ते १० वयोगटातील मुलींसाठी असणार्या सुकन्या समृद्धही योजने संदर्भात विशेष माहिती देण्यात आली आणि सर्वांनी आपल्या मुलीच्या उच्च शिक्षण आणि विवाहासाठी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी ३९९ रुपयामध्ये १० लाख रुपयाच्या अपघाती विम्या संदर्भात लोकामध्ये विशेष उत्सुकता दिसून आली आणि खूप लोकांनी त्याचा फायदा यावेळी घेतला. तसेच ५ वर्ष आतील मुला मुलीचे मोफत आधार यावेळी डाक विभागामार्फत काढून देण्यात आले. तसेच आधार क्रमांकासोबत मोबाइल नंबर लिंक करून देण्यात आले.यावेळी गावातील नागरिकांचा उत्स्पुर्त सहभाग दिसून आला. कार्यक्रमासाठी गावातील सरपंच श्री नामदेवराव साकळे, शिवराम साकळे (चेअरमन),अशोक साकळे (माजी उपसरपंच), संतोष साकळे (मा. तंटा मुक्ती उपाध्यक्ष), ग्रामपंचायत सदस्य श्री दौड सर यांची विशेष उपस्थिती राहिली.डाक विभागामार्फत औरंगाबाद परिक्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल श्रीमान अदनान अहमद( भारतीय डाक सेवा) श्री ए के धनवडे , अधीक्षक डाकघर, औरंगाबाद, श्री एन जी तोडकर, डाक निरीक्षक सिल्लोड उपविभाग, भाऊसाहेब बनकर , ब्रांच पोस्टमास्तर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. शेवटी डाक विभागामार्फत सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.