भावाची सुपारी देऊन कट करून जबरी चोरी घडवुन आणणा-या आरोपीस विरगाव पोलीसांनी केले शिताफिने अटक ..

Khozmaster
3 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत विरगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई औरंगाबाद जिल्ह्यातील दिनांक 13/10/22 रोजी भावाची सुपारी देणाऱ्यास आरोपींना केली अटक सविस्तर वृत्त 21/5/2022 रोजी रात्री 11.00 ते 11.30 वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे विरगाव हद्यीतील शिरसगाव शिवारातील शेतवस्तीवरिल संतोष संजय राऊत हे घराबाहेर झोपलेले यांचे घरी दोन अनोळखी व्यक्तींनी रात्री अचानक हल्ला करून त्यांची आई पुष्पा व वडिल संजय राऊत असे तिघांना, चाकुचा धाक दाखवुन,मारहाण करून बळजबरीने रोख रक्कम 10,000/- सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकुण 48,000/- रूपयांचा माल बळजबरीने घेऊन जात असतांना संतोष राऊत यांचे वडिल संजय बापुराव राऊत यांनी विरोध केला असता त्यांना चाकु मारूण जखमी केले अशा घटनेवरून पोलीस ठाणे विरगाव येथे भादंवी कलम 394 अन्वये दिनांक 22/5/2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद शेतवस्तीवरलि जबरी चोरीची गांर्भीयांने दखल घेत मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी तपासाचे अनुषंगाने विरगाव स.पो.नि. शरदचंद्र रोडगे यांना सुचना दिल्या यावरून नमुद गुन्हयाचा सचोटीने व बारकाईने तपास करित असतांना विरगाव पोलीसांना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारचे माध्यमांतुन या घटनेमध्ये संजय राऊत यांचा चुलत भाऊ नामे पोपट बापुराव राऊत याचा सहभाग असण्याची माहिती मिळाली यावरून विरगाव पोलीसांनी संशयीत पोपट बापुरव राऊत यास ताब्यात व विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांने सांगितले कि त्याचा आणि त्याचा चुलत भाऊ संजय भाऊराव राऊत यांचा मागील ब-याचा दिवसापासुन शेतीचा बंधा-यावरून वाद चालु आहे. यावरून त्यांचे परस्पराविरुध्द कोर्टात दावे दाखल असून यावरून तो सारखा वाद घालत असल्याने त्याला कायमचा धडा शिवण्यासाठी व धमकवण्यासाठी त्याची 50,000/- रूपयांमध्ये त्याचा ओळखीचा योगेश मधुकर हरणे याला सुपारी दिली होती.यावरुन योगेश हरणे व त्याचे साथीदाराने दिनांक 21/5/22 रोजी रात्री चुलत भाऊ संजय भाऊराव राऊत यांचे शेतवस्तीवरिल घरी हल्ला करून त्याला चाकु मारून जख्मी करून बळजबरीने रोख रक्कम, मोबाईल व सोन्याचे दागिने असा ऐवज घेऊन गेले होते.  यावरुन विरगाव पोलीसांनी तात्काळ यातील आरोपी योगेश मधुकर हरणे वय 28 रा. जातेगाव ता. फुलंब्री ह.मु. महालगाव ता. वैजापुर यांची गोपनीय माहिती काढुन महालगाव येथे सापळा लावुन शिताफिने त्यास अटक केली आहे. त्यास विश्वासत घेऊन विचारपुस करता त्यांने नमुद गुन्हा त्याचा साथीदार आकाश शिरसाट रा. कोळघर ता. गंगापुर यांचे सोबत पोपट बापुराव पवार वय 50 वर्षे रा. शिरसगाव यांचे सांगणेवरून सुपारी घेऊन केल्याचे सांगितले आहे. यातील दोन आरोपीतांना अटक करण्यात आली असुन पुढील तपास विरगाव पोलीस करित आहेत. नमुद कारवाई मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, मा. शिलवंत नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, वैजापुर, यांचे मार्गदर्शनाखाली शरदचंद्र रोडगे, पो.उप.नि. नवनाथ कदम पोलीस अंमलदार गणेश जाधव, सतिष गायकवाड योगेश तरमळे, यांनी केली आहे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *