सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुका व तालुक्याचा परिसरातील शेतकऱ्यांनी तालुका कृषि विभाग कार्यालय सोयगांव यांचे मार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य कार्यक्रम सन २०२२ अंतर्गत हरभरा प्रमाणित बियाणे कृषिसेवा केंद्र सोयगांव येथे अनुदानावर उपलब्ध असून तालुक्यातील जास्तीत शेतकरी वर्ग यांनी सदरील बियाणे परमीट घेऊन खरेदी करून पेरणी करावी असे आवाहन तालुका कृषि अधिकारी एस. जी. वाघ यांनी केले आहे. सदरील बियाणे खरेदीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती कृषि पर्यवेक्षक एच. बी. देशमुख यांनी दिली यात प्रामुख्याने लाभार्थी यांचा ७/१२ उतारा, आधार कार्ड झेरॉक्स गरजेचे असून लाभार्थी यांनी बियाणे खरेदी करतेवेळी देणे बंधनकारक राहील. तसेच सदरील बियाणे हे राजविजय २०२ हे वाण असून कृभको कंपनीचे असून सदरील बियाणे ३० किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध असून ३० किलो बॅगची किंमत अनुदान वगळून केवळ फक्त रू.१३५०/-सोयगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने कृषी सहाय्यक हेमंत देशमुख यांनी बोलताना सांगितले.