औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत:-चौकशीत दोषी आढळूनही सक्त ताकीद देऊन ग्रामसेवकास भ्रष्टाचार करण्यास अभय अजिंठा येथील तत्कालीन ग्रामसेवक जी.एन.सैवर यांची विविध प्रकरणात चौकशी व्हावी या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संदीप मानकर यांनी डिसेंबर 2020 मध्ये गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिल्लोड व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.औरंगाबाद यांना तक्रार केली होती. तब्बल 2 वर्षे चौकशी चा सोपस्कार पूर्ण करून चौकशीत दोषी आढलेल्या ग्रामसेवकास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी *सक्त ताकीद* देऊन दोषमुक्त केले आहे. यामुळे या प्रकरणात वरिष्ठांचे च हात ओले झाले असल्याचा संशय बळावला आहे. सर्व सामान्य जनतेने केलेल्या तक्रारींच्या चौकशीला दोन-दोन वर्षे लागून कर्मचारी निर्दोष सुटत असतील तर वरिष्ठ अधिकारीच भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असून कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यास रान मोकळे करून देत आहे. व शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारायला भाग पाडत आहेत. बेकायदेशीर ठराव घेणे, खोटे दस्ताऐवज तयार करणे, शौचालयाचे दुबार अनुदान वाटप करणे, दुष्काळात टँकर ची अफरातफर करणे, माहिती अधिकाराखाली मागितलेली माहिती देण्यास नाकारणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून आणि ते सिद्ध झालेले असून सुद्धा वरिष्ठांनकडून होणाऱ्या फक्त सक्त ताकीद या थातूर-मातूर कार्यवाहीने संशयाला जागा करून दिली आहे. वरिष्ठांचेच भ्रष्टाचाराला अभय असल्याने स्वराज्य संस्थेत भ्रष्टाचार बोकाळल्याचे चित्र चोहीकडे पाहायला मिळत आहे.वर्ग 1 च्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशीया प्रकरणात तक्रार दिल्या नंतर अनेक महिने टाळाटाळ करीत खुलताबाद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री.कहाटे यांच्या मार्फत चौकशी करण्यात आली. तद्नंतर गट विकास अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत चौकशीला बोलावल्या नंतर ही अनेक सुनावनीला गैरहजर राहून ग्रामसेवक सैवर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जणूकाही ठेंगाच दाखविला. शेवटी सर्व प्रकरणात सैवर यांना दोषी मानून आर्थिक चिरी-मिरी घेत वरिष्ठांनी सर्वसामान्यांना न्याय किती दुरापास्त आहे हे दाखवणारी फक्त आणि फक्त सक्त ताकीद नावाची शिक्षा दिली. म्हणजे आर्थिक चिरी-मिरीच्या भरवशावर निकाल हा आपल्या कर्मचाऱ्याला वाचविण्यासाठी त्याच्या बाजूनेच दिला जातो आणि आम्ही वरिष्ठच या भ्रष्टाचाराला खतपाणी घालतो, शासनाची तिजोरी म्हणजे आमची हक्काची वास्तूच आहे असेच चित्र या निकालातून पाहायला मिळत आहे.या प्रकरणात मा.लोकआयुक्त यांच्याकडे दाद मागणार प्रतिक्रिया :-ग्रामसेवक जी.एन.सैवर यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी वरिष्ठांची कार्यवाही संशयास्पद असून या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचारात वरिष्ठ अधिकारीही सामील आहेत. या प्रकरणी मी मा.लोकआयुक्त यांच्याकडे दाद मागणार आहे. कारण माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि ते सिद्ध झालेला भ्रष्टाचार कधीच खपवून घेणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे.अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीपभाऊ मानकर यांनी गोकुळसिंग राजपूत याच्याशी बोलताना सांगितले.