शिवाजी विद्यालय येवता येथे विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप..!!

Khozmaster
2 Min Read

दिपक मापारी, रिसोड रिसोड तालुक्यातील येवता येथे श्री शिवाजी विद्यालयात सिद्धेश्वर संस्थांचे महंत प. पु. शांती पुरी महाराज यांचे परमभक्त सोमनाथ उत्तमराव दिघे परमोरी,जिल्हा नाशिक यांच्यातर्फे वर्ग ५ वी ते १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना 12 ऑक्टोबर रोजी ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे अध्यक्ष मंतशांती पुरी जी महाराज हे होते. शिक्षक आमदार ॲड.किरणराव सरनाईक यांचे शुभहस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम चे कोषाध्यक्ष प्रदीपराव नाना देशमुख, उत्तमराव दिघे, संजय वडजे,सदाभाऊ आवारे,प्रमुख अतिथी होते,दिलीप नवघरे, गजाननराव देशमुख, कमल किशोर तोष्णीवाल यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय देशमुख यांनी केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आमदार ॲड.किरणराव सरनाईक यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास हा शिक्षकांचा मुख्य हेतू आहे. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळेला सर्व शैक्षणिक व भौतिक सुविधा देऊ असे वचन दिले. प्रदीपराव देशमुख यांनी यशस्वी जीवनाचा मूलमंत्र शिक्षण असून विद्यार्थ्यांच्या उज्वल व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो म्हणून शिक्षकाने तळमळी ने ज्ञानदान करावे असे आवाहन केले. उत्तमराव दिघे यांनी आपल्या भाषणात सांगितले की विद्ये विना व सत्कर्म विना मनुष्य जीवन व्यर्थ आहे प्रत्येकाने समाज हितासाठी कार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत शांतीपुरी महाराज यांनी मुलांना अभ्यास करा मोबाईल व टीव्हीपासून दूर राहा सत्संगती धरा संस्काराने वागा शिक्षकांचा व आई-वडिलांचा आदर ठेवा हा संदेश दिला. कार्यक्रमाला गावातील व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी बाबाजी चे भक्त वाशिम येथील गोपी काठोळे व कृष्णा काठोळे सहपरिवार उपस्थित होते व त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची व उपस्थित पाहुणे मंडळीची भोजनाची व्यवस्था केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन काठोळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर रोही सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

 

0 9 3 7 2 3
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *