३७ वर्षापासून खंडाळा रस्त्यावर डांबरच नाही..!!

Khozmaster
1 Min Read

गावकऱ्यांची बांधकाम विभागाकडे धाव: न्याय मिळण्याची अपेक्षा..                                           दिपक मापारी, रिसोड रोजगार हमी योजनेतून १९८६ साली खडीकरण झाले. तेव्हापासून रिठद ते खंडाळा या रस्त्यावर डांबर टाकले नाही. या खडतर रस्त्यावरून प्रवास करून वैतागलेल्या गावकऱ्यांनी न्याय मिळावा म्हणून वाशिम च्या बांधकाम विभागाकडे धाव घेत रस्ता डांबरीकरणाची मागणी सोमवारी गावकऱ्यांनी केली..रिठद ते खंडाळा शिंदे यादरम्यानच्या रस्त्याचे १९८५ साली रोजगार हमी योजनेअंतर्गत माती काम, खडीकरण करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत डांबरीकरण व्हावे. यासाठी लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. परिणामी ३७ वर्षात या रस्त्याचा प्रश्न निकाली निघू शकला नाही. आज ना उद्या या रस्त्याचे डांबरीकरण होईल, अशा थापा मारून गाव पुढारी गावकऱ्यांना आश्वासनावर ठेवत असल्याने रोष व्यक्त होत आहे. डांबरीकरण झाले नसल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल असतो. त्यामुळे शेतीचे कामे प्रभावित होतात. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी रिठद येथील सामाजिक कार्यकर्ते नारायणराव आरू यांच्यासह गावकऱ्यांनी बांधकाम विभागाकडे मागणी केली..

 

0 9 3 7 2 3
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *