गलवाडा गांवी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीर संपन्न

Khozmaster
2 Min Read

217 रुग्णांनी घेतला तपासणी शिबिराचा लाभ                                                                      सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगांव परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या तथा गलवाडा वेताळवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या सौ.सुशिलाताई चंद्रकांत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात लायन्स नेत्र रुग्णालय चिकलठाणा व सुशिलाताई इंगळे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 217 रुग्णांची तपासणी करण्यात आली तर 15 रुग्णांची चिकलठाणा येथील लायन्स नेत्र रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे.   या कार्यक्रमास सोयगाव नगरपंचायत नगराध्यक्ष आशाबी तडवी, उपनगराध्यक्ष सुरेखाताई काळे, नगरसेवक संध्याताई मापारी, गटनेते अक्षय काळे, बबलू हाजी, मातंग एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष तथा सिल्लोड शिवसेना नेते संदीप मानकर, सुनिल बनसोडे, प्रवीण बनसोडे, सुधाकर बनसोडे, राहुल अंभोरे, सरपंच पंजाबराव कुनगर ,ग्रा.पं. सदस्य रवींद्र जगताप, मधुकर इंगळे, फिरोझ पठाण, दिपाली औरंगे, सखुबाई इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष भगवान तायडे, उपाध्यक्ष सुरेश पाटील, पोलीस पाटील मिलिंद सोनवणे, श्रीराम पाटील, दत्तु दादा इंगळे , जीवन पाटील, भरत इंगळे, आनंदा इंगळे, ग्रामसेवक पुल्लेवाड, माजी सभापती संजय आगे,अरुण वाघ, अनिल इंगळे, संतोष सोनवणे, मोहम्मद पटेल, अन्वर पठाण, वनरक्षक नागरगोजे, वनपाल नागरे, वायरमन झोंड,पत्रकार ईश्वर इंगळे, विजय पगारे, सुनिल सैदाने, रुपचंद सरोदे, राहुल इंगळे, संजय इंगळे, रवी घन, भारत तायडे, आमखेडा सरपंच अनिता महाले ताई, पगारे ताई, शिल्पाताई बोर्ड, सोनाली मोरे, मायाबाई जगताप, कोकिळाबाई इंगळे, गिरजाबाई औरंगे, यशोदाबाई सैदाने, आशाबाई इंगळे आदींसहित गावकरी व परिसरातील सर्व स्तरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्वांनी सौ.सुशिला इंगळे यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या या आदर्श उपक्रमाचे कौतुक केले. तर त्यांच्या मित्रपरिवाराने हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी विशेष मेहनत घेतली..!

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *