जरंडी येथे शेतात ६३ किलो गांजाची झाडे नऊ फूट उंचीचे झाडे जप्त

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सपोनि अनमोल केदार यांची धडाकेबाज कारवाई सोयगाव तालुक्यातील जरंडी शिवारात कपाशी व तूर पिकामध्ये लागवड केलेली गांजाची झाडे दिनांक १२/१०/२०२२ बुधवार रोजी सपोनि अनमोल विनायक केदार यांना त्यांचे गुप्त बातमीदाराने दिलेल्या गुप्त माहितीवरून सोयगाव पोलिसांनी जरंडी शिवारात जाऊन शेतात तुरळक ठिकाणी ही झाडे असल्याने पोलिसांना ते शोधण्यासाठी तीन तास लागले.सपोनि अनमोल विनायक केदार यांनी मा, वरीष्ठांना हि माहिती दिली असता मा. वरिष्ठांनी दिलेले आदेश, मार्गदर्शन व दिलेल्या सूचनानुसार सहा.सपोनि अनमोल विनायक केदार यांनी छापा टाकून कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.जरंडी शिवारातील शेत गट नं. २९ मध्ये छापाची कारवाई केली असता सुभाष महादु महाजन यथ ४८ याने स्वतःच्या शेतात विना परवाना बेकायदेशीर रित्या चोरटी विक्री करण्याचे हेतुने प्रतिबंधीत असलेल्या गांजा वनस्पतीची लागवड करून व बाळगुन ६३ किलो १९० ग्रॅम वजनाची एकूण किमत ३,१५,१५०/- रुपये किमतीचा एन.डी.पी.एस गुन्हयाचा माल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला आहे.नऊ फूट उंच वाढलेली गांजाची झाडे सोयगाव पोलिसांनी सुभाष महाजन यांच्या शेतात जप्त केलेल्या गांजाची झाडे ही नऊ उंच वाढलेली आढळली असता या परिपक्व झाडांना पिवळसर बोंडे लागली होती.दरम्यान घटनास्थळी यावेळी सोयगाव कृषी विभाग पथकाचे कृषी सहाय्यक अर्जुन सुरडकर, विश्ववजीत तायडे, महसूल विभागाचे कर्मचारी अधिकाऱ्यांसह सोयगाव पोलिसांनी यावेळी पंचनामा केला.आरोपी सुभाष महाजन याच्याविरुद्ध कलम २०(अ), (१) अमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ (एन.डी.पी.एस) प्रमाणे कायदेशीर कारवाई करून पोलीस स्टेशन सोयगाव येथे गुन्हा १९९ / २०२२ दाखल करण्यात आला असून गांजाची झाडे व आरोपीला ताब्यात घेतले आहे.गुन्हयाचा पुढील तपास उपनिरीक्षक सतीश पंडित याच्यांकडे दिले आहे. नमुद गुन्हयातील आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री मनीष कलवानिया, औरंगाबाद ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक श्री पवन बन्सोड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विजय मराठे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अनमोल केदार,उपनिरीक्षक सतीश पंडित,पोलीस कर्मचारी राजु बरडे, ज्ञानेश्वर सरताळे,अजय कोळी,रवींद्र तायडे, गणेश रोकडे, नारायण खोडे यांनी केलेली आहे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *