सावळदबारा येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत परिसरात बिबट्या असल्याचा नागरिकांना संशय सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील एका शेतकऱ्याच्या शैलेश राजेंद्र जैस्वाल यांच्या गाईच्या वासराला वन्यप्राण्याने गंभीर जखमी केले आहे. परिसरात वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे आढळल्याने याची माहिती वनविभागाला सागर जैस्वाल यांच्या कडून देण्यात आली. बुधवारी वन्य प्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वासराची तपासणी करताना दि.१२/२०/२२ रोजी सावळदबारा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी वासराची पाहणी केली.सावळदबारा येथील शेतकरी राजेंद्र जैस्वाल यांच्या मालकीच्या मधील शेतात दिवशा चरण्यासाठी गेलेल्या वासराला बिबट्या वन्यप्राण्याने जखमी केले.वनविभागाचे कर्मचारी, आणि वनमजुर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळ बिबट्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. शेतवस्त्यांवर पाळीव कुत्री, बकऱ्या, कोंबड्या, गायी, म्हैशींची सहज शिकार मिळत असल्याने बिबटे मानवी वस्त्यांकडे आकर्षिले जात असल्याचे सांगितले जाते.उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान यांनी सांगितले.जाईचादेव डोंगरावर बिबट्या व अस्वल असल्याची चर्चा सर्वत्र आहे.या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी सावध रहावे, रात्रीवेळी शेतकऱ्यांनी शेतात सावधगिरी बाळगावी असे वनविभागाचे वनरक्षक सुनील खरोदे यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *