खदखद फेम प्रा. नितेश कराळे उद्या नांदुऱ्यात श्रीकांत हिवाळे

Khozmaster
2 Min Read

नांदुरा प्रतिनिधी:- शेतकरी कन्या पुत्र एमपीएससी- यूपीएससी व शैक्षणिक विकास क्रांती संघटना नांदुराचे वतीने उद्या रविवार दिनांक16 आक्टोबर ला नांदुरा अर्बन बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहाध्ये संध्याकाळी सहा वाजता शिक्षणाचे महत्त्व आपल्या खास अस्सल वऱ्हाडी मायबोलीतून मुक्तपणे पटवून देणारे खदखद फेम प्रा. नितेश कराळे यांच्या शैक्षणिक मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन केले आहे.            शेतकरी कन्या पुत्र शैक्षणिक संघटनेचे संस्थपक अध्यक्ष व शेतकरी पुत्र अभ्यासिकेचे प्रणेते राजेश गावंडे हे शेतकरी पुत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच धडपड करीत असतात . शेतकरी पुत्र व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच ते निराशामुक्त,तणावमुक्त जीवन जगून त्यांनी आपले शैक्षणिक ध्येय प्राप्त करावे यासाठी कृ. ऊ .बा .समिती अंतर्गत राजेश गावंडे यांनी शेतकरी पुत्र अभ्यासिका स्थापन करून विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाशाची वाट दाखवण्याचा विडाच उचलला आहे .शेतकरी पुत्र अभ्यासिका हा पॅटर्न राज्यभर व्हावा तसेच जिल्हापरिषद शाळांना उभारी मिळावी यासाठीही शासन दरबारी त्यांची संघटनेच्या माध्यमातून मागणी सुरू आहे . शेतकरी पुत्र व विद्यार्थ्यांसाठी ते सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात .              विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे आणि त्यांच्या नव्या आशा पल्लवीत व्हाव्यात यासाठी प्रा नितेश कराळे सरांचे सहज सोप्या भाषेतील मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपयुक्त व दिशादायी ठरणारे असते .या मार्गदर्शन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेतील गुणांपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची मानून खऱ्या अर्थाने जिद्द, प्रयत्न व वेळेचा सदुपयोग कसा करावा तसेच आपल्यामध्ये आपले वेगळेपण निर्माण करण्याची साधने आहेत ती कशी वापरावी या विषयीचे मार्गदर्शन प्रा .कराळे करणार आहेत.प्रत्येक परीक्षेमध्ये यश मिळत नाही मात्र नापास झाल्यानंतर खचून न जाता जीवनाच्या परीक्षेत पास होता येतं हे प्रा.कराळे यांचे मार्गदर्शन ऑनलाईन युट्युब च्या माध्यमातून आपण पाहतो आहे .मात्र पहिल्यांदाच आपल्या नांदुरा शहरात त्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनाचे आयोजन शेतकरी कन्या पुत्र संघटनेच्या वतीने केले आहे. या कार्यक्रमाचा सर्व शाळातील विद्यार्थी व पालकांनी सदूपयोग करून घेण्यासाठी उपस्थित राहावे असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

 

0 8 9 4 7 8
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *