नुकसानीच्या पहाणी दौऱ्यात आ सौ श्वेता ताई महाले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
चिखली : गत दोन तीन वर्षांपासून परतीचा मुसळधार पाऊस आणि शेतकऱ्यांचे नुकसान ठरलेले आहे. हाता तोंडाशी आलेला घास परतीचा पाऊस अक्षरशः हिसकावून घेत आहे. त्यामूळे मोला महागाचे बियाणे , खते , फवारणी ,मशागत यासाठी होणारा प्रचंड खर्च शेतकरी सहन करत त्यासाठी केलेली मेहनत ही वाया जात आहे. यामुळे गत दोन तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे. यावर्षी सुद्धा परतीच्या पावसाने कहर केलेला असून पिकांची प्रचंड नासधुस झालेली आहे . अनेक दिवस सततच्या पावसाने पाण्यात उभे राहिल्याने सोयाबिन सडून गेले आहे. सोंगणीला आलेल्या उभ्या सोयाबिनला कोंब फुटल्याने सोन्या सारखे सोयाबिन मातीमोल झाले आहे. त्यामूळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असल्याने त्यांना किमान थोडी फार का होईना आर्थिक मदत मिळणे हा त्यांचा हक्क असून सदर शासकिय मिळण्यासाठी पंचनामे आवश्यक आहे. पंचनामे करतांना कोणताही भेदभाव न करता पंचनाम्यातून एकही नुकसान ग्रस्त शेतकरी सुटणार नाही यांची दक्षता घेण्याच्या सूचना आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी चिखली तालुक्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यात अधिकाऱ्यांना दिल्या .
आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी दि 16/10/2022 रोजी चिखली तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शासकिय अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी केली असता त्यांनी वरील सूचना दिल्या.
मौजे सिंधीहरळी,मौजे पेठ , मौजे शेलसुर , मौजे मोहदरी मौजे धोत्रानाईक ,हिवरा नाईक, मौजे किन्ही नाईक, मौजे तोरनवाडा, मौजे किन्हीसवडत येथे पीक पहाणी या गावातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी तहसीलदार डॉ अजितकुमार येले , तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे,डॉ कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजपा, संजय जी महाले जिल्हा सचिव भाजपा ,सौ सिंधुताई तायडे माजी सभापती,विक्की हरपाळे जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा अनमोल ढोरे पाटील तालुका उपाध्यक्ष भाजपा ,
विष्णू भाऊ शेळके सरपंच पेठ, संजय शिपणे, विकी हरपळे जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा अनमोल ढोरे पाटील तालुका उपाध्यक्ष भाजपा ,सागर पवार राजेंद्र हरपळे, प्रमोद बहुरूपी,सौ, शीला धुरंदर सरपंच किन्ही सवडत, नंदू सेठ धवणे, डॉ तुपे, नारायण घगे,सरपंच भीम सरसंडे,उदयनगर मंडळ अधिकारी पिंपळे
पेठ मंडळ अधिकारी अरविंद शेळके
उदयनगर तलाठी अनिरुद्ध खेडेकर,तोरणवाडा तलाठी दिलीप गीते
धोत्रा नाईक तलाठी वनिता मोरे
मोहदरी तलाठी बबन काकड
वैरागड तलाठी फुरकान सय्यद
कृषी सहाय्यक दीपक विणकर
कृषी सहाय्यक मंगेश भुसारी
कृषी सहाय्यक श्री लहाने
कृषी सहाय्यक श्री गव्हले
कोतवाल ब्रम्हदेव शिंदे
कोतवाल दत्ता शिंदे
कोतवाल प्रल्हाद थोरात
कोतवाल घोडके,प्रकाश काळे , दत्ता काळे , नारायण कुटे ,महादेव बोचरे, नारायण जाधव , लक्ष्मणदादा रिंढे ज्ञानेश्वर सखाराम रिंढे अशोक रिंढे
अशोक गायकवाड, शेलसूर सरपंच विजय सखाराम धंदर बिरगंडे, प्रशांत रिंढे, पुरुषीलम दिने, पुरुषोनम धुंदळे, भाषपा बुथ प्रमुख गजानन रिंढे आकर कदम शेषराव घोराडे, संजुनाना दिडे, भगवान धारणकर, अशोक धुरंदर, गजानन चोपडे , अमोल बहुरूपी यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते..
Users Today : 25