दिपक मापारी, रिसोड शेती क्षेत्रात शेतकरी, उद्योजक, शेतमजूर, अशा विविधांगी भूमिका बजावणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत आहे आकडेवारीनुसार महिलांचे शेतीमध्ये ३२ टक्के, तर कृषीविषयक रोजगारामध्ये ४८ टक्के योगदान आहे. दुग्धउत्पादन आणि पशुधन व्यवस्थापनात ७.५ कोटी महिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. अर्थात, शेतीमधील ग्रामीण महिलांचे महत्त्व लक्षात घेणे, ही एक महत्त्वाची बाब आहे. परंतु, बऱ्याच देशांमध्ये शेतीमधील महिलांची भूमिका ही केवळ मदत मानली जाते, ही बाब लक्षात घेऊनच राष्ट्रिय महिला किसान दिवस दिनांक 15 ऑक्टोंबर 2022 रोजी गुरुदेव आश्रम कारंजा लाड येथे शेती शेत्रात महिला सक्षमीकरण व्हावे या अनुषंगाने शेती मधील महिलांचा सक्रिय सहभाग या विषयावर उमेद, मावीम व नगर पालिका कारंजा लाड यांचे सहकार्याने कार्यशाळा घेण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख कृषि विज्ञान केंद्र वाशिम डॉ. आर. एल. काळे तर प्रमुख उपस्थतीमध्ये, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक सुधीर खुजे, तालुका व्यवस्थापक तृष्णा ठाकरे, माविम चे शेखर खोडवे, नगर पालिका कारंजा लाड चे शहर अभियान व्यवस्थापक सांगरत्न नरवाडे, गुरुदेव सेवा आश्रम चे व्यवस्थापक सुनील दशमुखे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.डी एन इंगोले, शुभांगी वाटाणे, स्वयं शिक्षण प्रयोग चे व्यवस्थापक उत्तम पाटोळे ई मान्यवर उपस्थित होते.प्रस्ताविक करताना शुभांगी वाटाणे यांनी महिलांनी शेती व्यवसायामध्ये नवनवीन तंत्रज्ञान समजून घेवून निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यास त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होईल तसेच मानवी आरोग्य सुदृढ असणे चे दृष्टिकोनातून पोषण परस बाग, व पौष्टिक तृणधान्य जसे बाजरी ज्वारी नाचणी वरी ई चे आहारातील महत्त्व पटवून दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. काळे यांनी महिलांनी शेतीमधील शास्त्र समजावून घेवून शेतीमधील प्रगती साधावी तसेच कौशल्य आत्मसात करून महिला बचत गटांनी आपल्या उत्पादित होणाऱ्या मालाची प्रत दर्जेदार ठेवावी असे आव्हान केले. डॉ. डी एन इंगोले यांनी महिलांनी शेती हा व्यवसाय आहे असे लक्षात घेऊन शेती वर होणाऱ्या खर्चाचा लेखाजोखा ठेवून अनेक शेती माल प्रक्रिया उद्योग जसे सोयाबीन , तुर , काजू प्रक्रिया उद्योगा वर मार्गदर्शन केले. सुधीर खुजे यांनी संद्रिय शेती कडे वळणे आजची गरज आहे असे प्रतिपादन केले . तर मावीचे शेखर खोडके यांनी मावीम द्वारे चालणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली, सांगरत्न नरवाडे यांनी हरितक्रांती झाली हळूहळू जमिनीचा कस कमी झाला हा कस वाढविण्याकरिता नैसर्गिक शेती कडे वळणे आवश्यक आहे असे सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेद चे सपना नाचोने यांनी केले तर आभार प्रदर्शन एस आर बावसकर यांनी केलेया कार्यक्रमास कारंजा तालुक्यातील महिला बचत गटाच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, माविम , उमेद अभियान चमू ने अथक परिश्रम घेतले.
Users Today : 1