शासकीय दंत महाविद्यालयातील डाँक्टरांची उडाली बोंबडीऔरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूतऔरंगाबाद : जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना शनिवारी दि.१५/१०/२२ रोजी बत्ती गुलचा जबरदस्त शॉक बसला. शासकीय दंत रुग्णालयात सायंकाळी त्यांच्या दातांवर उपचार सुरू असतानाच अचानक वीज गेली. त्यामुळे येथील डॉक्टरांसह अधिष्ठातांचीही भंबेरी उडाली. जनरेटर उपलब्ध नसल्याने चक्क मोबाइलच्या उजेडात पालकमंत्र्यांवर उपचार करावे लागले.पालकमंत्री भुमरे यांनी शुक्रवारी घाटीची पाहणी करत आढावा घेतला होता. याचवेळी त्यांनी येथील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाचीदेखील पाहणी केली होती. दंत रुग्णालयाचा आढावा घेत असताना त्यांनी डॉक्टरांना आपल्या दातांची तपासणी करून घ्यायचे सांगितले. त्यानुसार कालच दातांचा एक्सरे काढल्यानंतर शनिवारी सायंकाळी ५ वाजता रूट कॅनॉलसाठी पालकमंत्री भुमरे दंत रुग्णालयात आले. पालकमंत्री उपचारासाठी येणार म्हटल्यावर अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगेंसह सर्वच डॉक्टर्स हजर होते. स्वतंत्र कक्षात पालकमंत्र्यांवर उपचार सुरू असताना अचानक वीज गेल्याने सर्वांचा गोंधळ उडाला. कक्षात अंधार पडल्याने पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तर काहीच सुचत नव्हते. भुमरे यांचे स्वीय साहाय्यक गणेश मडके, कृष्णा बोरसे यांनी कक्षात धाव घेतली. शेवटी सर्वांच्या मोबाइलच्या उजेडात भुमरे यांच्यावर रूट कॅनॉल उपचार सुरू करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ. प्रज्ञा बनसोडे, डॉ. समीर खेडकर, डॉ. गितम दुदुसकर यांना उपचारासाठी दंत क्ष-किरण विभागप्रमुख डॉ. जयश्री पगारे, डॉ. शिरीष खेडगीकर यांनी सहकार्य केले.वीज कंपनीला कल्पना दिली होती पालकमंत्री भुमरे हे सायंकाळी उपचारासाठी येणार असल्याचे वीज कंपनीला कळविले होते. यावेळी कुठलेही शटडाऊन करू नये अशी विनंती केली होती. मात्र पालकमंत्र्यांवर उपचार सुरू असतानाच वीज गेली.हा नेहमीचा त्रास असून, जनरेटरचा प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.डॉ. एस.पी.डांगे अधिष्ठाता