जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजनेचा लाभ मार्गदर्शन संपन्न प्रा जीवन कोलते यांची माहिती सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच स्वातीताई भाऊराव पाटील,उपसरपंच मो.आरिफ मो लुखमान व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दि.१५/१०/२२रोजी हे शिबीर संपन्न झाले. तरी बँक आपल्या दारी शाखा व्यवस्थाक मयूर सोनटक्के सर्व योजनेच्या बाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. सावळदबारा नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून माहिती जाणून घेतली. या शिबिराचे असे आवाहन प्रा. जीवन कोलते (सामाजिक कार्यकर्ते)यांनी केले होते.वरील कर्जाबाबत व योजनांबाबत संपूर्ण माहिती अटी व नियम याबाबत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाले. गावातील व परिसरातील सर्व नागरिकांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्यात आला. दिनांक 15/१०/२२ शनिवार रोजी सावळदबारा येथे ग्रामपंचायत कार्यालयात ठीक सकाळी आठ वाजता महाराष्ट्र ग्रामीण बँकच्या वतीने संपन्न झाली. गावातील व परिसरातील प्रत्येक नागरिकांनी व तरुण उद्योजकांनी, बचत गटातील महिलांनी व व्यापारी वर्ग ,भांडवलदार , बँक खातेदार व इतर सर्व प्रतिष्ठित मंडळी यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून माहिती जाणून घेतली.खास आपल्यासाठी”‘ बँक आपल्या दारी विविध कर्जाच्या योजना मुद्रा लोन योजना जीवन ज्योती विमा योजना अटल पेन्शन योजना व कृषी कर्ज योजनाया विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ अभ्यासक व मार्गदर्शक आपल्याला लाभणार आहे .तरी सर्वांनी या कार्यशाळेचा ग्रामस्थांनी लाभ घेतला.सावळदबारा व परिसरातील १८ खेडेनी या सुंवर्ण संधीचा यांचा लाभ घ्यावा अशे आवाहन प्रा.जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते)यांनी केले होते.यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यावस्थापक मयूर सोनटक्के, आफिसर काशिनाथ वावरे,कँशिअर शिवा जैस्वाल,सरपंचपती भाऊराव पाटील, उपसरपंच मो.आरिफ मो लुखमान, पो.पा.विलास कुल्ले,सरपंचपती भागवत जाधव, ताराचंद राठोड,मो.आशपाक मो.ईशा,सोपान मानकर,राजू दांडगे, सिकंदर तडवी,नरेश देशमुख,प्रमोद साखरे,मा.ग्रा.स.फकीराभाऊ तडवी, ईशा तडवी,परिसरातील ग्रामस्थ व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती प्रा.जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते)यांनी आपले ज्ञानपंख या वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत याच्याशी बोलताना सांगितले.