साहेब, दिवाळी कशी साजरी करायची हो..!!

Khozmaster
3 Min Read

शेतात सोयाबीन सडले, बाजारात भाव पडले..दिपक मापारी, रिसोडसातत्याने पाऊस कोसळतोय त्यामुळे शेतातील हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे..बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी साचल्याने शेतातील काढणीला आलेली सोयाबीन सडले आहे. तर बाजारात भाव पडले आहेत. अन्न शासन मात्र घोषणाबाजीच्या वल्गना करण्यात व्यस्त आहे. तर प्रशासकीय यंत्रणा सुस्त असल्याने शेतकरी मात्र आत्महत्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे.शेतात जिकडे तिकडे पाणी साचून सोयाबीन भूई सपाट झाली आहे. तर काही ठिकाणी कापून ठेवलेली पिके माती मोल झाली आहेत. अतिवृष्टीमुळे जमीन खंगाळून निघाल्यात, तर दुसरीकडे सोयाबीनला हमीभाव नाहीत. बेभाव सोयाबीन मार्केटला भाव नाहीत. अशा परिस्थितीत साहेब, दिवाळी सण कसा साजरा करायचा हो अशी आर्तहाक शेतकरी देत आहेत.रिसोड तालुक्यातील बहुतास भागात पावसाने थैमान घातले आहे गेल्या पंधरा दिवसात झालेल्या ढगफुटी दृश्य पावसाने अनेक गावात प्रचंड फटका बसला आहे. अद्यापपर्यंत प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा पंचनामा केलेला दिसून येत नाही. प्रशासनाकडून अद्याप शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करताना आढळलेले नाहीत. यावर्षी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे नदी नाल्या, भरून वाहत आहेत. जमीन खरडून निघाली आहे. काढणीला आलेले पीक पाण्यात आहेत. शेतात जाण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. अस्मानी संकटाने होत्याचे नव्हते झाले असून अशा स्थितीत दिवाळी सणासुदीचा उत्साह कसा साजरा करता येईल असा सवाल नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.सरसकट नुकसान भरपाई द्या.रिसोड मालेगाव मतदार संघात गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने सुरू असलेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले आहे. शेतातील पिके गेल्यात जमा आहेत. त्यामुळे शासनाने पंचनाम्यात वेळ न गमावता सरसकट नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी यावेळी शेतकरी करीत आहेत..बळीराजा संकटात….सातत्याने दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागतात त्यामुळे बहुतांश भाग चांगलाच होरपळून निघाला. त्यातच शेतमालाला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. यावर्षी चांगला बाजार भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली होती. ही पिके काढणीला आली असतानाच पावसाने जोरदार तडाखा देत शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या आणि काही ठिकाणी सोगूंन शेतात पडलेली सडून जात आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर बळीराजा संकटात सापडला आहे..त्वरित पंचनामे करा….परतीच्या पावसाने काढणीला आलेले सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने अक्षरशा ओढुन नेल्याचे चित्र आहे. काढणीला आलेले सोयाबीन या पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. सोयाबीन शेतात सडून जात असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने युद्ध पातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे….

 

0 9 3 7 2 0
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *