सोयगाव कै. बाबुरावजी काळे(आप्पा) यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेतकरी संवाद मेळावा संपन्न

Khozmaster
2 Min Read

मा.डॉ. पंजाबराव डख यांच्या उपस्थितीशेतकऱ्यांना मार्गदर्शन ;मो.आरिफ मो.लुखमान यांची माहिती सोयगाव:– येथील अजिंठा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी मंत्री कै. बाबुरावजी उर्फ आप्पासाहेब काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक १८/१०/२२ रोजी सकाळी अकरा वाजता संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्यावतीने “भव्य शेतकरी संवाद मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते.या संवाद मेळावाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.डॉ. पंजाबराव डख उपस्थित होते.या सुवर्ण संधीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा;अशे आवाहन मो.आरिफ मो.लुखमान यांनी केले होते.मेळाव्याचे उदघाटन प्रसिद्ध हवामान अभ्यासक श्री पंजाबराव डख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष औरंगाबाद मा. रंगनाथनाना काळे अभ्यास शिक्षण संस्था हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.तर मा श्री तुळशीरामचंद पाटील (वन शेती पुरस्कर्ते) व मा डॉ भालचंद्र वायकर (अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून अजिंठा शिक्षण संस्थेचे सचिव मा प्रकाशदादा काळे व प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री यांची उपस्थित होते. यावेळी मा.श्री. डॉ.पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.शेतकरी संवाद मेळावा यशस्वी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मान्यवर प्राचार्य डॉ राजेश यादव, उपप्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे, कनिष्ठ विभागप्रमुख डॉ उल्हास पाटील, पदव्युत्तर समन्वयक डॉ छत्रघन भोरे, संयोजन समिती प्रमुख डॉ भाऊसाहेब गाडेकर, डॉ पंकज शिंदे, डॉ सैराज तडवी, प्रा अनिल मानकर, प्रा रवी जाधव, डॉ गणेश मिसाळ यांच्यासह संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रयत्न केले होते. यावेळी सपोनि अनमोल केदार, प्रा.जीवन कोलते, शंकर खराटे, रवींद्र गायकवाड, वसंत चोरमारे, शे.फयाज,सुनील माकोंडे, सावळदबारा परिसरातील मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान यांनी बोलताना सांगितले.

 

0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *