जळगाव : जळगाव पूर्व खा. मधील रायसोनी महाविद्यालयात कार्यरत असलेले व आपल्या शिस्तप्रिय तथा अभ्यासू वृत्ती आणि सौजन्यशील विचार व सुहास्य व्यक्तिमत्वामुळे सर्वत्र लोकप्रिय असलेल्या आणि सातत्यपूर्ण परिश्रमातून काही महिन्यांपूर्वीच डॉक्टरेट पदवी मिळवून नुकतीच डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांचे गाईड म्हणूनही विद्यापीठाने त्याच्यावर जबाबदारी टाकली असे सदाबहार डॉ. राजकुमार कांकरिया यांना, साहित्यिक विश्वात आपली विधायक व यशस्वी वाटचाल करणाऱ्या बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने आयोजित, दि. २०-११-२०२२ रोजी महाराजा अग्रसेन रिसाॅर्ट, चिखली येथे होत असलेल्या बहुजन साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणारा, फुले-शाहू-आंबेडकर हा बहुश्रुत प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित झाला असून, त्याबाबतचे निमंत्रण पत्र, त्यांना संघाचे निमंत्रक तथा संघटक ज्येष्ठ कवी बबन महामुने, सचिव शाहीर मनोहर पवार, आणि अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे, चिखली यांनी जळगाव येथील रायसोनी महाविद्यालयात जाऊन मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केले. सदर पुरस्काराच्या घोषणेमुळे डॉ. कांकरिया यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Users Today : 61