तेल्हारा तालुका कृषी अधिकारी वानखडे यांची बदली तेल्हारा

Khozmaster
2 Min Read

तालुका प्रतिनिधी रितेश कुमार टीलावत येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांची बदली अमरावतीला स्मार्ट प्रकल्पात झाली आहे मिलिंद वानखडे यांनी या ठिकाणी कार्यरत असताना अधिकारी असल्याच्या तोऱ्यात न वागता शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेत त्यांना वेळोवेळी सहकार्य केले शेतकऱ्यानी ज्या ज्या वेळी आपल्या शेतात बोलाविले त्या त्या वेळी शेताच्या बाधावर जावुन त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारे आणि शेतकऱ्याचे प्रश्न प्राथमिकतेने सोडणारे अधिकारी म्हणून मिलिंद वानखडे यांची ख्याती होती एका चांगला अधिकाऱ्याची या ठिकाणाहून बदली झाल्याने हा तालुका एका चांगल्या अधिकाऱ्याला मुकला असल्याच्या प्रतिकिया शेतकऱ्यामध्ये व्यक्त होत आहेत तेल्हारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे तेल्हारा येथे कार्यरत असताना त्यांनी तालुक्यात 950 हेक्टर क्षेत्र फळबागा खाली आणले. तेल्हारा तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी संत्रा बेल्ट निर्माण केला.मलचींग वरील टरबूज लागवडीस प्रोत्साहन घरचे सोयाबिन बियाणे साठी शेतकऱ्यांत जनजागृती करून घरचे बियाणे राखून ठेवण्याची सवय लावली.बीजप्रक्रिया बाबत मोठ्या प्रमाणत मोहीम राबवून शेतकऱ्यांत जनजागृती केली. करोना काळात जीवाची पर्वा न करता शेतकरयांना केळी, संत्रा, टरबूज मार्केट मध्ये विक्री साठी मदत केली.पिक विमा कंपन्यावर वचक ठेऊन शेतकरयांना विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. कृषी निविष्ठा विक्री बाबत सतर्क राहून दोन ट्रक पकडुन गुन्हे दाखल केले.मोठ्या प्रमाणात क्षेत्र ठिबक, मिनी स्प्रिंकलर, तुषार सिंचन खाली आणले.गुलाबी बोंड अळी बाबत जनजागृती मोहीम राबविली  योजनेत न्याडेप युनिट बांधणी मोहीम स्वरूपात राबवून 100 पेक्षा जास्त युनिट पूर्ण केले

 

0 8 9 4 6 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *