तालुका प्रतिनिधी तेल्हारा रितेश कुमार टीलावत=मूळचे हिवरखेड येथीलच रहिवासी असलेले राईस कोचिंग क्लास, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स क्लासेस चे संचालक भरत राठी यांचा सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमात त्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला . तेल्हारा तालुक्यातील प्रथम आयआयटी झालेले व राईस कोचिंग , इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स क्लासेस चे संचालक भरत राठी हे हिवरखेड येथील प्रतिष्ठित व्यापारी विनय सेठ राठी यांचे सुपुत्र आहेत. सेंट पॉल अकॅडमी मध्ये भरत राठी यांना शाल व श्रीफळ देऊन शाळेचे प्रिन्सिपल चंद्रकांत तिवारी व पत्रकार रितेश टीलावत यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक नवनीतजी लखोटीया सर, संस्थेचे उपाध्यक्ष लुणकरंजी डागा सर व संस्थेचे सचिव प्रमोद चांडक सर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमात शाळेचे प्रिन्सिपल चंद्रकांत तिवारी सर, मुख्याध्यापिका सौ . गांधी मॅडम तसेच शाळेचे शिक्षक चैतन्य खारोडे , जगदीश वडाळकर,अंकुश अमानकर,रवींद्र वसे,
स्वप्निल कातव,शशिकांत दही,ओवेस खान आदोची उपस्थिती होती.
Users Today : 27