मटका अवैध देशी विदेशी गावठी दारू..अवैध धंद्यांना ऊत आला
दिपक मापारी, रिसोड-तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना ऊत आला असून खुलेआमपने सर्रास मटका जुगार अवैध देशी विदेशी गावठी दारू उपलब्ध होत आहे. यामधून अनेक गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत असून तरुण पिढी वाम मार्गाला लावून आपले भविष्य उध्वस्त करून घेत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे व्यवसाय या मार्गातून प्रचंड माया कमवीत असून या सर्व प्रकारांमधून सर्व सामान्य नागरिक छोटा मोठा व्यवसायिक नागवला जात आहे. अवैध व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाल्यामुळे अंतर्गत गटबाजी कलह व गुन्हेगारी प्रवृत्ती यांनी शिरकाव केल्याने मोठ्या प्रमाणात अनेकदा अराजकता ही माजविला जात आहे. ग्रामीण भागात रोज मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याऐवजी अनेक नागरिक तरुण या व्यवसायाकडे वळत असल्याने कुटुंब्यामध्ये कौटुंबिक कलह वाढून भांडणे तंटे ही नित्याचीच बाब झाली आहे. हे सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी ही बघून गप्प बसणारे माहाभाग तालुक्यात बसले असल्याने या अवैध व्यवसायाला उघडे राण मिळाले आहे. किमान संपूर्ण तालुक्यात मटक्याचे अनेक काउंटर जवळपास सुरू असल्याचे समजते त्यात मोठमोठे जुगाराचे अड्डे अहो रात्र सुरू असल्याचेही खात्रीलायक कळते. हा सर्व प्रकार कुठेतरी थांबून तरुण पिढीला व नागरिकांना अशा व्यवसायामधून प्रवृत्त करून चांगले आयुष्य जगण्याकरिता मार्गदर्शन होणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन असून त्यांच्याकडून मात्र ज्या पद्धतीने गुन्हे रोखणे व गुन्हेगारीला आळा घालने अशी कर्तव्य पार पाडण्याची अपेक्षा असते मात्र ती पूर्ण होताना दिसत नसल्यामुळे सर्वत्र गुन्हेगारी मध्ये वाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शहरासह अनेक खेड्यामध्ये खुलेआम अवैध व्यवसायांना उदान आल्याचे चित्र दिसत आहे. संबंधितांनी त्वरित यास आळा घालावा व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जनतेतून होताना दिसत आहे. एवढे मात्र खरे..
Users Today : 22