अकोला येथील बेघर निवासातील वृध्दांना फराळ वाटप
अकोला – सुख दुःखाच्या क्षणात सर्वांच्या सोबत आनंद तथा दुःख वाटून घेणे ही मानवता धर्माची शिकवण कृतीत परिवर्तीत करणाच्या भरीव उद्देशाने दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाने आज या कार्याची पूर्तता केली.
मंडळाचे सभासद प्रा. डॉ मंदार कृष्णराव देशमुख यांनी अकोट फैल येथील बेघर निवारा या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या सर्व वृद्ध पुरुष – महिला यांना दिवाळी फराळाचे वाटप केले. मंडळाचे अध्यक्ष प्रा . गजानन भारसाकळे यांनी सर्व आबाल वृद्धांचे या प्रसंगी आशीर्वाद घेऊन गरजेनुसार सतत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वार्यासाठी अकोला येथील गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान अकोला या संस्थेचे अध्यक्ष रोहन बुंदेले यांच्या द्वारे सतत कार्यरत असलेल्या बहुमूल्य उपक्रमांचा प्रा. भारसाकळे यांनी या प्रसंगी आवर्जून उल्लेख करून गौरव केला . गाडगेबाबा मंडळाने जिल्हा बदलवून दाखविलेल्या समाजकार्याच्या सहभागाबाबत बेघर निवारा संस्थेच्या व्यवस्थापक श्रीमती उषाताई राऊत यांनी आभार व्यक्त केले. फराळ वाटप प्रक्रियेबाबत गाडगेबाबा मंडळाचे उमेश इंगळे व गजानन महाराज शर्मा तथा बेघर निवारा संस्थेच्या वतीने बुंदेले यांचे सहकार्य लाभले.