औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद दिनांक 30/10/2022 वार रविवार,विकेंड रविवार औरंगाबाद सेंट्रल बसस्थानक आगार क्रमांक 2 आज रोजी पहाटे पासुनच प्रवाशांची मोठी गर्दी , दिवाळीच्या सुट्टी नंतर ,कामावर जायला ,उशीर व्हायला ,या म्हणीप्रमाणे , सेंट्रल बसस्थानक वर पहाटे पासुनच प्रवाशांची मोठी गर्दी झाली ,आता जवळपास दुपारचे तीन वाजले तरीही गर्दी चे सुरुच आहे
” महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तर्फे गरजेनुसार प्रवाशांच्या सेवेसाठी ,अनेक बसेस , सोडण्यात आल्या आहेत व बसेस सोडण्यात येत आहे या कामी विभाग नियंत्रक श्री सचिन क्षीरसागर साहेब, विभागीय वाहतुक अधिकारी श्री अमोल अहिरे साहेब,यंत्र अभियंता श्री सोनवणे साहेब,आगार व्यवस्थापक श्री संतोष घाणे साहेब,वाहतुक नियंत्रक ची टीम,वाहतुक निरीक्षक, सहाय्यक वाहतुक निरीक्षक स्थानक प्रमुख,श्री व्हि की धुतमल, श्री संतोष नजन,श्री बाळासाहेब साळुंके,श्री विजय बोरसे,श्री मोटे साहेब,श्री बारी साहेब सह अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत
“शिवशाही,शिवनेरी , हिरकणी स्लीपरकोच,आराम ,निम-आराम साधी बसेस सर्वच हाऊस फुल्ल,टिकीट बुकिंग साठी लाईनच लाईन ,ज्यादा बसेस सोडण्यात येत आहेत, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिश्रम घेत आहेत प्रसारमाध्यमांना बोलतांना सांगितले श्री संतोष घाणे सांगितले” तसेच क्रांती चौक पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री डाॅ गणपत दराडे साहेब यांच्या देखरेखीखाली बसस्थानक पोलीस चौकी चे ASI श्री पवार साहेब सह , सिव्हिल डे्स मधील ,डि बी पथक,बाॅब शोधक नाशक पथक,महिला दामिनी पथक, गुन्हे शाखा पथक सह पोलीसांचा ही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे’ प्रवाशांच्या सोयीसाठी’ दिवाळी निमित्त एस टी हाऊस फुल्ल असल्याने “एस टी च्या उत्पन्नात भरघोस वाढ ,जनतेच्या , प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दैनिक भास्कर – मच्छिंद्र नागरे – यांनी बोलताना सांगितले।