योगेश नागोलकार राहेर:-भारत हा विविधतेने नटलेला तसेच विविध जाती धर्माचा देश आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशात एकता नांदावी, म्हणून कन्याकुमारी ते काश्मीर असा समग्र देश एकत्र करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केल्यामुळेच आजचा समृध्द भारत देश जगभरात नावलौकीकास पावला आहे. दिनांक 31. ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11:00 वाजता पोलीस स्टेशन चान्नी येथे भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून शपथ घेण्यात आली. शपथ घेण्याकरता पोलीस स्टेशन येथे ठाणेदार राहुल वाघमारे गणेश महाजन ,सह 12 कर्मचारी हजर होते. तसेच चान्नी गावातील तरुण मुले व नागरिक यांना बोलावून त्यांना देखील राष्ट्रीय एकात्मता दिवसाच्या अनुषंगाने माहिती दिली. तसेच राष्ट्रीय एकता दिवसाच्या अनुषंगाने युनिट रुन घेण्यात आला. सर्व अधिकारी व कर्मचारी व नागरिक यांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच राष्ट्राची एकता व अखंडता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.