नंदुरबार -: नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचा निवडणुक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून या अंतर्गत दि . २४ ऑगस्टपासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली होती . नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या काल दि . १ सप्टेंबर रोजी शेवटच्या दिवसा अखेर ७५ ग्रामपंचायतीच्या ६१५ सदस्य पदासाठी १ ह्जार ४४७ तर ७५ लोकनियुक्त सरपंच पदासाठी ३१५ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहे . दरम्यान ४ गावात लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकेक अर्ज आल्याने या ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत .
नंदुरबार तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींची कोरोनामुळे २०२० पासून मुदत संपून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या . यातच कोरोना निर्बंध असल्याने निवडणुक लांबल्या होत्या . दरम्यान नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीसाठी ऑगस्ट महिन्यात निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम घोषीत केला . नंदुरबार तालुक्यात ७५ ग्रामपंचायतींचा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून निवडणुकीमुळे ग्रामीण भागात वातावरण चांगलेच तापले आहे . तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्याशेवटच्या दिवशी नामांकन सादर करण्यासाठी इच्छुकांसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली . चारचाकी वाहनात आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवारी अर्ज सादर केले . ग्रामपंचायतीसाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष , शहराध्यक्ष कार्यकर्त्यांसमवेत हजेरी लावतांना दिसत आहे . नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचा निवडणुकीसाठी ७५ ग्रामपंचायतीच्या ६१५ सदस्य पदासाठी १ हजार ४४७ तर ७५लोकनियुक्त सरपंच पदासाठी ३१५ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहे . तर शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठी ७ ९ ६ तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी १७१ अर्ज दाखल करण्यात आले .
दरम्यान नंदुरबार तालुक्यातील सुतारे देवपूर , भवानीपाडा , वरूळ या ४ गावातील लोकनियुक्त सरपंच पदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने या ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत . वासदरे ४ , दुधाळे १ , नळखे र्खु . २ , नांदखे १७ , उमर्दे बु . १ , खाडसगाव १ , कोळदे १२ , पळाशी ३ , शिंदे ६ , वाघोदा ९ नामनिर्देशपत्र दाखल करण्यात आले .