निवडणुकीला रंगत ; समस्याचे डोंगर कायम..!!

Khozmaster
1 Min Read

रिसोड तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतसाठी मतदान होणार; सोई सुविधांची मात्र वनवा..दिपक मापारी, रिसोड तालुक्यात ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या १८ डिसेंबरला होऊ घातल्या आहेत. या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील राजकीय मंडळी कडून आरक्षणाप्रमाणे उमेदवाराची शोधा शोध करून कागदपत्राची जमवाजमव सुरू केली आहे. गावागावातील चौका चौकात निवडणुकीच्या गप्पा रंगायला सुरुवात झालेली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली असून नेते मंडळीच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. निवडणुकीचा रंग चढला असला तरी समस्याचा डोंगर मात्र कायम आहे. गावागावातील अनेक गावात जायला असते पण बरोबर नाहीत. विज, पाणी, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा नाहीत, रोजगार नाही रोजगारासाठी हजारो नागरिकांना शहरांमध्ये स्थलांतरित व्हावे लागते. अनेक गाव खेड्यातील रुग्णांना बोळीतुन मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागत आहे. अनेक खेडेगावातील मुख्य रस्त्यावर व चौका चौकात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. रस्त्यावरील अतिक्रमानाने वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागतो. अशा अनेक समस्या नागरिकांना भेडसावत असल्या तरी राजकीय नेते विकासाचा बाऊ करीत आहेत..

 

0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *