शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे..

Khozmaster
2 Min Read
शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे.‌.
पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे शारीरिक संतुलनासाठी दैनंदिन होत असलेल्या मानसिक दडपणातून मुक्त होण्यासाठी मैदानी खेळ खूप महत्त्वाचे ठरतात. पुस्तके ज्ञान संगणक आणि मोबाईल यामध्ये गुरफटलेल्या या जगात आज रोजी मैदानी खेळ लुप्त होत आहेत. शालेय शिक्षण घेत असताना माझ्या जीवनात मैदानी खेळ खेळण्याचा योग आला. मैदानावर मुक्त संचार खेळाडूंचा संच आणि शिक्षकांचे मार्गदर्शन या सर्व बाबी एकत्र येऊन ज्यावेळी एक खेळाडू घडत असतो त्यावेळी त्याचा आदर्श संपूर्ण देश नव्हे तर खेळाडूचे अखेर विश्व घेत असते. खेळाडू वृत्ती म्हणजे कधी न हार मानणे ही प्रवृत्ती माणसाला जीवनात कोणत्याही संकटात सामोरे जायला सतत मदत करत राहते. फ्लोअर बॉल या खेळाविषयी इंटरनेटवरून माहिती मिळाली होती परंतु प्रत्यक्षात मेहकर सारख्या मागासलेल्या शहरात फ्लोअर बॉल चे कोच पोलीस दलातील श्रीराम निळे सर क्रीडा शिक्षक लोखंडे सर,मार्गदर्शक जाधव सर व मुळे मॅडम त्याचप्रमाणे प्राचार्य सौ सरिता खंडेलवाल यांनी माझ्या मधील खेळाडू वृत्ती ओळखून माझ्यासोबतच माझ्याच वर्गातील हर्षदा खोकले व आचल धोटे यांना घेऊनआमचा चमू तयार केला. नवख्या खेळात पाहिजे तसा उत्साह आमच्यामध्ये निर्माण झाला नव्हता परंतु निळे सरांचे सातत्य लोखंडे सरांची मेहनत आणि खंडेलवाल मॅडम यांची जिद्द व मुळे मॅडमचे चेन्नईमध्ये नेहमी मार्गदर्शन हेच प्रोत्साहन आम्हाला मिळत होते. मैदानावर कसून सराव करत असताना सर्वांनी ठरवलं होतं पहिल्यावेळी राज्यस्तरावर खेळत असताना घडलेल्या चुका पुन्हा करणार नाही. यावेळी कोणत्याही परिस्थितीत राज्यस्तरावर हार मानणार नाही प्रचंड मनोबल वाढवून जिद्द आणि सरावाची चिकाटी यांचा समेट घडवत आई-वडिलांच्या सहकार्य तथा परवानगीने यावेळी राजश्री ग्लोबल स्कूल मेहकर चे नाव राष्ट्रीय स्तरावर गाजवण्याचे यथोचित सदभाग्य आमच्या टीमला लाभले याबद्दल सर्वस्वी कौतुक टीम मधील माझ्या सर्व खेळाडू मैत्रिणीचे करते. आमच्या मधून खेळाडूवृत्ती शोधत त्या खेळाडूची मानसिकता प्रबल करणाऱ्या तुमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब, सचिव ऋषी भाऊ जाधव साहेब,सर्व मान्यवर तथा शालेय समिती अध्यक्ष महोदय या सर्वांचे मी धन्यवाद करते
कु.साक्षी विनोद भिसे रा. महादेव वेटाळ, वर्ग दहावा राजश्री ग्लोबल स्कूल मेहकर
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *