मेहकर तालुक्यामधील विश्व हिंदू परिषद चे माहेरघर समजले जाणारं जानेफळ सारख्या छोट्याशा गावात निलेश नाहटा उर्फ मंटूसेठ यांची सुकन्या कुमारी प्रतिमा निलेश नाहटा हिच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं कौतुक पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी तसेच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब यांनी शुभेच्छा पत्र पाठवून मागील काळात केले आहे. बहीणाबाई सारखा आदर्श पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला. अर्थातच तिने केलेले कार्य त्याच दर्जाचे होते. या विद्यार्थिनी मधील खेळाडू वृत्ती जागा झाली ती म्हणजे आठव्या वर्गात शिकत असताना सेंट्रल पब्लिक स्कूलची ही विद्यार्थिनी स्केटिंग खेळात सराव करत होती. मुख्यतः या खेळामध्ये शारीरिक संतुलन बिघडून इजा होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते अपंगत्व सुद्धा येऊ शकते. या सर्व गंभीर बाबीचा विचार करून सुद्धा आपल्या पाल्याचे खेळामधील आकर्षण बघून नाहटां दांपत्यानी कु.प्रतिमा हिला सतत पाठबळ दिले. सरावा दरम्यान मैदानावर ने आण करण्यापासून खेळासाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या अमूल्य वेळा मधून वेळ काढत उद्योजक निलेश नाहटा यांनी आपल्या मुलीसाठी उपलब्ध करून दिले. वयाच्या सतराव्या वर्षी बारावी कक्षेमध्ये शिकत असताना सुद्धा प्रतिमा नहाटा हिचा सराव सुरूच होता. याच दरम्यान कुमारी प्रतिमा हिने शेगाव येथील झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कांस्यपदक प्राप्त केले. सेंट्रल पब्लिक स्कूलच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा रोवला गेला. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचे जीवन आव्हानात्मक असते. अशी विचारधारा असलेल्या समाजातील पालकांना निलेश नहाटा यांच्या सुकन्या कुमारी प्रतिमा नाटा हिच्या जीवनपटलाची ही कथा निश्चितच प्रेरणादायी ठरणार. वैचारिक संकुचता बाळगून मुलीसाठी कुजत भावना ठेवणाऱ्या तसेच आपल्या अंगातील गुणांना वाव न देता त्यांना दडपून ठेवणाऱ्या मुलींसाठी सुद्धा हा प्रेरणादायी प्रवास निश्चितच मार्गक्रमण करणारा ठरेल.