देवेंद्र सिरसाट नागपूर रायपूर हिंगणा
येथील स्वर्गीय देवकीबाई बंग इंग्रजी माध्यम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा बालक दिन संस्थेच्या संचालिका अरुणा महेश बंग व विद्यालयाचे प्राचार्य नितीन तुपेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सारखे पोशाख घालून सहभाग घेतला. तर इतर विद्यार्थ्यांनी कार्टूनच्या वेशभूषेत येऊन कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांकरिता समूह नृत्यासह विविध कार्यक्रम सादर करून चिमुकल्या विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन यादव यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मनीषा कटरे, त्रिशला सूर्यवंशी, रेखा पाटिल, चेतना मांडवकर, भारती भोयर,सीमा पारसे.,कंचन खंगार,रूपाली जीवतोड़े,मोनाली कैकाड़े, अनीशा शेख, ज्योति राठौड़ आदींनी परिश्रम घेतले.
Users Today : 8