महेंद्र हिवाळे चिखली प्रतिनिधी

चिखली येथील तहसील कार्यालया समोर वंचीत बहुजन आघाड़ी व महीला आघाड़ी चिखली तालुक्यातील कार्यकर्ते पदाधीकारी , हीतचींतक व जिल्हा पदाधीकारी यांनी एकदीवशीय धरणे आंदोलन केले,या नंतरचिखली तालुक्याच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांना चिखली तहसील च्या मार्फत निवेदन देण्यात आले.जिल्हा उपाध्यक्ष अशोकसिंग सुरडकर तालुकाध्यक्ष संजय धुरंधर शहराध्यक्ष बाळू भिसे यांच्या नेतृत्वात पक्षाच्या आदेशानुसार एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.सर्वोच्च न्यायालयाने उच्चवर्णीयांना EWS या असंविधानीक मार्गाने 10 टक्के आरक्षण देवून उच्चवर्णीयांची सोय केली आहे. वास्तविकता देशामध्ये जातीयता आणि हीन भावना या आधारावरती दुर्बलाना आरक्षण देण्याचे काम संविधानाने केले होते, परंतु आज EWS च्या नावावर जन्मोजन्मीची सोय उच्च वर्णीयांनी केली आहे.आरक्षणाचा निकस आर्थिक मागासलेपण नसून जातीहीनतेच्या भेदभावातून विकासापासून दूर असलेल्या समूहाला विकास साधण्यासाठी दिलेली संधी आरक्षण होती.परंतु सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक निकषावर आरक्षण देवून आरक्षणाच्या मूळ उद्देश बाजूला सारून उच्चवर्णीयांना EWS च्या नावावर आरक्षण देवून त्यांची सोय केली आहे.या अगोदर सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्क्याच्या वर आरक्षण देता येणार नाही ही त्यांचीच मर्यादा का मोडली ? ती केवळ EWS ला आरक्षण देवून त्यांनी उच्चवर्णीयांची सोय केलेली आहे.
आज देशात ओबीसी जातीसमूहाल त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणात म्हणजेच 52 टक्के आरक्षण देण्यात यावे. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी कडून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले, तसेच जो पर्यंत ओबीसींना आरक्षण मिळनार नाही तो पर्यंत वंचीत बहुजन आघाड़ी लढत राहील असे वंचीत बहुजन आघाड़ी चिखली तालुक्यातील पदाधीकांरींने म्हटले आहे .या आदोलनात सहभागी झाले होते
तालुका अध्यक्ष संजय धुरंधर,जिल्हा उपाध्यक्ष अशोकसिंह सुरडकर शहर अध्यक्ष बाळाभाऊ भीसे, प्रवकते मिलिंद माघाडे तालुका सचीव तालुका सचिव जितेंद्र निकाळजे महासचिव सतीश पांडगळे प्रदीप खंदारे प्रदीप वाकोडे अंबादास जाधव संजय जाधव संदीप जाधव देविदास जाधव मालती ताई निकाळजे सुभिद्रा गवई शारदा लहाने चंद्रभागा जाधव सविता घेंवदे शिलाबई इंगळे जया अंभोरे.
Users Today : 29