विभागीय प्रतिनिधी एजाज खान मेहकर
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हिंदु-मुस्लिम् ऐक्याचे प्रतिक असलेल्या पीर पहाडी यात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रसिद्ध समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.दिनांक 13/11/2022 रोजी दिल्ली येथील कव्वाल आणि बुऱ्हाणपूर येथील लेडीज कव्वाल यांच्यात जोरदार कव्वालीचा मुकाबला कार्यक्रम आणि काल दिनांक 15/11/2022 रोजी दिल्ली येथीलच संपूर्ण देशात नावाजलेले चांद कादरी यांच्या सुमधुर आणि प्रसिद्ध कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.चांद कादरी यांची कव्वाली ऐकण्यासाठी चिखली,शिरपूर जैन, जानेफळ,मालेगाव,बुलढाणा,लोणार तसेच मेहकर लोणार मतदार संघातील कव्वाली शौकीनाचा अभूतपूर्व असा जनसागर उसळला होता.सायंकाळी 6 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यन्त सुरु असलेल्या या कव्वाली च्या कार्यक्रमाचा रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.” *दुल्हा बना है ख्वाजा अजमेर की बस्तिमे ” तसेच “मोहम्मद ना होते तो कुछ भी ना होता.” या*कव्वाली वर प्रेक्षकांनी संपूर्ण मैदान अक्षरशः डोक्यावर घेतले.या कार्यक्रमाला जितकी उपस्थिती सर्वधर्म पुरुषांची होती त्याहीपेक्षा जास्त महिलांची उपस्थिती होती. मेहकर नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष कासम भाई गवळी यांच्या नेतृत्वात दरवर्षी ही यात्रा भरत असते.मागील दोन वर्ष कोरोना काळ असल्यामुळे ही यात्रा भरली नव्हती या मुळे या वर्षी ही यात्रा फार मोठ्या प्रमाणात भरली. या ही वर्षी सतत चार ते पाच दिवसापासून सुरु असलेली ही यात्रा अतिशय शांतपणे पार पडली.दरवर्षी ही यात्रा अतिशय शांत पणे पार पडत असल्यामुळे या यात्रेबद्दल यात्रेकरूंची विश्वासहार्ता वाढत आहे आणि यात्रेकरूंची संख्या दरवर्षी वाढत आहे.यात्रा सुरळीत पार पाडल्या मुळे आणि चांगले सहकार्य केल्या बद्दल कासम भाई गवळी यांनी सर्व यात्रे करूंचे व्यापाऱ्यांचे पोलीस प्रशासनाचे तसेच यात्रेला जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल जगामालकाचे आभार मानले. या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने महिला व पुरुषांची तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी प्रदेशप्रतिनिधी,सांस्कृतिक सेल, माजी नगराध्यक्ष, नगर सेवक, सेवा दल, एन .एस. यु.आय,अल्पसंख्यांक सेल, युवक काँग्रेस चे सर्व पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नेते कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र माने तसेच मो.शकूर यांनी केले.