पत्रकार हा त्याच्या कामावरून ओळखला जातो.
मित्रांनो मी तुमच्यासारखाच पत्रकारिता करून संपादक झालो आहे.आज मला हा मिळणारा मान सन्मान केवळ तुमच्यामुळे मिळतं आहे.
म्हणून या क्षेत्रातील माझा अनुभव शेअर करणं माझं कर्तव्य आहे.पत्रकारिता ही विविध आयामाचीअसते. शोध पत्रकार, साहित्यिक ,क्राईम,बॅलन्स पत्रकार पोल -खोल , निर्भीड निडर, आणि महत्त्वाची म्हणजे टीआरपी, एमआरपी पत्रकारिता पत्रकारिता करत असताना लोकांच्या साध्या व सरळ बातम्या छापून, समाजासाठी भ्रष्टाचार अन्याय अत्याचार विरुद्ध लढा उठवून, लोकांच्या जीवनपटलावर आर्टिकल कविता शब्दांकन करून, पत्रकारितेची विश्वास अर्हता जपून, यापैकी खोजमास्टर ग्रुप ऑफ मीडियामध्ये सर्वच क्षेत्रात तुम्हाला बिनधास्तपणे तुमच्या संपादकाच्या संपूर्ण सहकार्याने कार्य करता येईल.वर्तमानपत्र, पोर्टल तुमचेच आहे.
तेव्हा तुमच्या तक्रारी सूचना यावर विचार करण्यासाठी तुमचा संपादक बांधील आहे.विविध सदर आपण चालवत असतो.यापैकी एक म्हणजे
सक्सेस स्टोरी
नावाचा सदर सर्वांसाठी अतिशय फायद्याचा आहे.
यामध्ये तुम्ही तुमच्या परिसरातील कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे असे व्यक्ती, युवा, स्त्री ,विद्यार्थी यांची यशोगाथा वर्णन करू शकता त्यामुळे तुमची लोकप्रियता वाढेल आणि पत्रकारितेचा दर्जा सुद्धा सुधारेल.अर्थातच काही भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी पोलखोल नावाचा सदर सुरू करू शकता.विद्यार्थी करिअरसाठी संबंधित क्षेत्रातील मान्यवरांची आत्मकथा सुद्धा प्रकाशित करू शकता.
स्त्री समस्या बाबत तज्ञ महिलांचे मत सुद्धा मांडू शकता.अशा विविध संकल्पना आपण साकारू शकतो..सर्वांनी याबाबत राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त अवश्य विचार करावा आणि आपल्या लेखणीमधून सामाजिक, आर्थिक , वैयक्तिक हित कसं साधता येईल याबाबत विचार करावा
धन्यवाद 🙏🙏