ठिकठिकाणी सोलारच्या पार्क उभारून कृषी पंपासाठी विज पुरवठा करणार

Khozmaster
3 Min Read
कृषी पंपांना दिवसभर विज देण्याचे आ सौ श्वेताताई महाले पाटील यांचे ध्येय
चिखली
विधान सभा मतदार संघातील प्रत्येक गावातील कृषी पंपाच्या विजेची समस्या सोडविण्यासाठी मतदार संघातील प्रत्येक वीज वितरण उपकेंद्राला सौर ऊर्जेच्या माध्यमातुन सोलार पार्क उभारून वीज पुरवठा करून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना पदिवसा व पुरेसा वीज पुरवठा करण्यासाठी तातडीने सोलार ऊर्जेचे प्रस्ताव मुख्यमंत्री सौर उर्जा वाहिनी योजनेअंतर्गत सादर करण्याच्या सूचना आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी विजेच्या बाबत आयोजित ऑनलाईन बैठकीत केल्या .
आ.सौ.श्वेता ताई महाले पाटील या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे महावाणिज्य तर्फे इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशिप प्रोग्राम (IVLP) च्या अंतर्गत “लीन इन(डिया) – पाश्चात्य आणि मध्य भारतातील महिला आमदारांच्या पुढच्या पिढीचे सशक्तीकरण” या तीन आठवड्यांच्या कार्यक्रमासाठी अमेरिकेला गेलेल्या असताना ही त्यांनी मतदार संघातील शेतकऱ्याच्या कृषी पंपाना सुरळीत वीज मिळावी यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सोबत अमेरिका वरून ऑनलाईन बैठक घेतली.
चिखली विधान सभा मतदार संघातील प्रस्तावीत सौर पार्क
चिखली मतदारसंघात सोलर पार्क तयार करण्यासाठी डोंगरशेवली, तोरणवाडा, पांढरदेव, कोलारा, मनुबाई, वरखेड,  डोंमरूळ, दुधा, साखळी, सिंदखेड , सोयगाव, ऐनखेड , वळती, आंधइ, सावळी,  भोकर, चांडोळ ,बोधेगाव, इत्यादी गावांमध्ये असणाऱ्या शासकीय  ई क्लास जमिनीमध्ये सोलर पार्क उभारल्या जाणार आहे. यासाठी या गावातील जमिनीचा सर्व्ह करुन त्या त्या ठिकाणी उपलब्ध जागेच्या प्रमाणात त्या त्या क्षमतेचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी केल्या.
आ. सौ .श्वेता ताई महाले म्हणजे घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी
डॉ कृष्णकुमार सपकाळ
आ .सौ. श्वेता ताई महाले या सद्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या आहेत. आज शनिवार असल्याने त्या ठिकाणी शासकीय दौरा नाही . शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आहे परंतु विजेच्या समस्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज मिळत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही.  वारंवार वीज जाणे, डिपी नादुरुस्त होणे या समस्यांनी शेतकरी त्रस्त झालेला आहे. त्याकरिता आ सौ श्वेता ताई महाले यांनी विजेच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये त्यांनी सौर ऊर्जा पार्क सोबतच शेतकऱ्यांच्या नादुरुस्त ट्रांसफार्मर तातडीने देण्याबाबत तसेच वारंवार वीज खंडित न करता सुरळीत वीज पुरवठा करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.  त्यामुळे आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील  या अमेरिकेत असताना सुद्धा त्यांनी आपल्या विधानसभेमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क तुटू दिला नाही . आपल्या मतदारसंघांमध्ये त्यांचे पूर्णपणे लक्ष असून आज त्यांनी ऑनलाईन घेतलेली बैठकी म्हणजे ” घार उडते आकाशी मात्र चित्त तिचे पिलापाशी ” या व्यक्तीला साजेशी असल्याने प्रतिपादन भाजपा तालुका अध्यक्ष डॉक्टर कृष्णकुमार सपकाळ यांनी यावेळी केले.या बैठकीसाठी अधीक्षक अभियंता विज वितरण कंपनी बद्रीनाथ जायभाये साहेब, बोरकर उपअभियंता,भाजपा तालुकाध्यक्ष डॉ कृष्णकुमार सपकाळ , ॲड सुनील देशमुख तालुका अध्यक्ष , बबनराव गोऱ्हे अध्यक्ष जगदंबा पतसंस्था, जिल्हा कार्यकारणी सदस्य सुनील पोफळे, भारत मामा शेळके, प्रा वीरेंद्र वानखेडे,  पंजाबराव धनवे जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा,विनोद सीताफळे तालुका सरचिटणीस , संदीप उगले,डॉ राजेश्वर उबहंडे तालुका सरचिटणीस, गणेश बाजी,बंडू अंभोरे, तेजराव अंभोरे, श्याम वाकदकर,अनमोल ढोरे, गजानन धोडगे, प्रवीण खंडेलवाल, दत्ता शेवाळे, बद्री महाले,नवलसिंग इंगळे ,गजानन परिहार ,आकाश सुरूषे यांच्यासह सर्व फिडर वरील ज्युनियर इंजिनियर उपस्थित होते..
0 9 4 6 8 0
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *