प्रतिनिधी रामेश्वर वाढी
विदर्भातल्या पातूर तालुक्यात सती आसोला या ग्रामीण भागातून नोकरी निमित्त पिंपरी चिंचवड पुणे येथे आलेल्या संदीप चव्हाण या तरूण युवकाने मालवाहक आयशरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अनोळखी इसमाचा आपली कार्यतत्परता दाखवत जीव वाचवला.सविस्तर वृत्त असे की कुदळवाडी चिखली येथे स्पाईन रोड वर असलेल्या उड्डाणपूलाखाली सातारा येथील अत्यंत गरिब परिस्थिती असलेला तरूण जो की दिवस भर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम करायचा व संध्याकाळी याच उड्डाणपूलाखाली गेल्या महिनाभरापासून झोपायचा व सकाळी उठून कामावर जायचा दि १८ च्या संध्याकाळी तो तरुण नेहमी प्रमाणे कामावरून याठिकाणी रस्त्याने चालत येत होता तेव्हा भरधाव वेगाने विरूद्ध दिशेने येणाऱ्या एम एच १५ बी जे ७६८९ या मालवाहतूक करणाऱ्या आयशरने त्याला जोरदार धडक दिली.या जोरदार धडकेत तो तरुण बेहोश होऊन खाली पडला त्याच्या दोन्ही पायांना जबर मार लागून ते रक्तबंबाळ झाले होते तेथून अनेक नागरिक जात होते परंतु कुणीही थांबून त्या तरूणाची मदत करत नव्हता तेव्हा विदर्भातील संदीप चव्हाण की जे रूग्णसेवक संघटना महाराष्ट्र राज्य भोसरी विधानसभाचे अध्यक्ष आहेत हे आपल्या कामावरून घरी जात असताना त्यांच्या नजरेत तो आला त्यांनी आपली दुचाकी गाडी थांबवली व त्या अनोळखी इसमाची परिस्थिती बघीतली अनेक वाहनांना त्यांनी थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु कुणी थांबत नव्हते.अशा वेळी त्याच भागात राहणारे संदीप चे मित्र रूग्णसेवक संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष शिवकुमार बायस यांना मोबाईल द्वारे या घटनेची सविस्तर माहिती दिली.तेव्हा त्यांनी संदीप ला १०८ नंबर वर फोन करून अंम्बुलंस बोलवून त्या अपघातग्रस्त इसमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय सी एम रूग्णालयात नेण्यास सांगितले व काही अडचण आल्यास परत फोन करण्याचा सल्ला दिला त्यानुसार संदीप ने १०८ ला फोन करून अंम्बुलंस बोलावली व त्या जखमी इसमास रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करून त्यास योग्य उपचार मिळवून देण्यास बहुमोल मदत केली यावेळी सुनील शिंदे व तुषार सोनवणे यांनी संदीप चव्हाण यांना मोलाची साथ दिली.रूग्णसेवक संघटना महाराष्ट्र राज्य भोसरी विधानसभाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांच्या या कार्यतत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
रस्त्यावर अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा सामाजिक भान ठेवून प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेऊन मदतीला धावून आले पाहिजे आज दुसऱ्या वर ही वेळ आहे उद्या आपल्यावर येऊ शकते व आपल्याला ही कुणीतरी मदतीला धावून यावे असे वाटत असेल तर पहिला आपला मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे असे संदीप चव्हाण यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले आहे.