बुलढाणा (प्रतिनिधी): शिक्षकांविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच ‘शिक्षक दिन’ होय. भारतात दरवर्षी ०५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने अंबाशी येथील जि. प. उर्दू प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. सर्वप्रथम भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या जीवनात शिक्षकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसेच शिक्षक हे विद्यार्थ्यांवर तसेच समाजावर चांगले संस्कार करतात त्यामुळे शिक्षकाला विद्यार्थ्यांचा खरा मित्र व मार्गदर्शक असे सुद्धा म्हटले जाते, असे मत यावेळी मोहसिन खान यांनी व्यक्त केले. याप्रसंगी रिदा आफरीन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहसिन खान बिसमिल्ला खान यांनी शिक्षक दिनाचे निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक अकिल सौदागर सर, सैय्यद राहत सर यांचे सत्कार केले. यावेळी कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम, हसन कुरेशी, जावेद खान, वसीम मौलाना, सय्यद नासेर, सय्यद इसराईल, शेख चाँद, शेख सादिक, आसिफ खान, समशेर पठाण, शेख मुरसलीम आदि उपस्थित होते.