सारडा स्टील अँड पॉवर कंपनीने केली अवैध वृक्ष तोड! हिंगणा वनविभाग झोपेत… सात आठ महिन्यांपासून सुरू वृक्ष तोड सुरू होते….

Khozmaster
1 Min Read
देवेंद्र सिरसाट नागपूर.
हिंगणा वन परिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मौजा निलडोह, एमआयडीसी परिसरातील सारडा स्टील कंपनी अँड पॉवर कंपनी प्लॉट नंबर T – १/१ येथे सागवन व आडजात असे ३०० चे वर झाडांची कत्तल केली,मात्र वन विभागाकडून वृक्ष तोडी बाबत कोणत्याही प्रकारची रीतसर परवानगी न घेता अवैधरित्या मुळासकट उपटून वृक्षांची कत्तल केली.ही बाब सामाजिक कार्यकर्ते गजानन ढाकुलकर यांच्या लक्षात येताच त्यांनी या बाबत हिंगणा वनविभागाला अवगत केले. नंतर वन विभागाने रीतसर कार्यवाही सुरू केलेली असून सदर जमिनीचे मालकी हक्का बाबत तपास सुरू आहे. त्या बाबत महसूल विभाग व एम.आय.डी.सी.विभागाकडे पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे.सदर कारवाही नागपूर वन विभाग नागपूरचे उपवनसंरक्षक डॉ.भगतसिंग हांडा यांचे मार्गदर्शनाखाली, डॉ. बी.एन.स्वामी परिविक्षाधीन ( भा.व.से.)सहायक वनसंरक्षक श्री.सुरेंद्र काळे वनपरिक्षेत्र अधिकारी कु.रिना पी.राठोड क्षेत्र सहा.हिंगणा ( अती कार्य ) श्री.एन.एन.केंद्रे कार्यवाही करीत असल्याचे समजले, परंतु वनविभागाची परवानगी न घेता येवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वृक्ष तोड होणे ही बाब गंभीर असून संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे,आता या बाबत काय काय कारवाई होते या कडे हिंगणा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागुन आहे, काही दिवसांतच सरकार नागपुरात दाखल होणार आहे त्यामुळे लोकांची उत्सुकता या प्रकरणी अजूनच वाढली आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *