देवेंद्र सिरसाट नागपूर.
नागपूर जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदासाठी अँड.रोशन रामदास बागडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी व इतर महापुरुषांच्या प्रतीमांना अभिवादन करण्यात आले. तसेच मागील तीन तपाहून अधिक कालावधीत जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर चे समीकरण सरळ बसविणारे ॲड. बागडे यांचे जिवलग मित्र स्वर्गीय सुदीप जयस्वाल यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यादरम्यान अँड. बागडे व सर्व उपस्थित भावूक झाले होते.गेल्या तीन दशकांत प्रत्येक क्षणी सुदीप सरांचे खंदे समर्थक बनून आपण उभे होतो आणि आज आपल्या नामांकन दाखल करताना आपला जिवलग मित्र काळाच्या पडद्या आड आहे याची खंत सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.ॲड. रोशन बागडे याचे नामांकन दाखल करतेवेळी शेकडो च्या संख्येने वकील वर्ग उपस्थित होता. तसेच त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देवून न्यायालय परिसर दणाणून सोडला.ॲड. रोशन बागडे यांचेसाठी सूचक म्हणून जिल्हा वकील संघाचे विद्यमान अध्यक्ष ॲड. कमल सतुजा, उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील ॲड. श्रीरंग भांडारकर, वरिष्ठ वकील ॲड. अरुण अग्रवाल, वरिष्ठ वकील ॲड. संजय ब्रह्मे, उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अतिरिक्त सरकारी अधिवक्ता ॲड. संजय डोईफोडे, कौटुंबिक न्यायालय नागपूर चे वकील संघाचे अध्यक्ष श्याम आंभोरे, वरिष्ठ वकील ॲड. मुस्तफा अब्बासी, वरिष्ठ वकील ॲड. मिलिंद गाणार आदींनी प्रस्ताव दिला.तसेच अनुमोदक म्हणून जिल्हा वकील संघ नागपूर चे विद्यमान सचिव ॲड. नितीन देशमुख, विद्यमान कार्यकारिणी च्या कार्यकारी सदस्या युवा ॲड. शबाना खान, वरिष्ठ वकील ॲड. उमाशंकर अग्रवाल, युवकांचे आवडते ॲड. आशिष शेंडे, युवा वकिलांचे खास मार्गदर्शक ॲड. नितीन रुडे, सिनियर ॲड. शर्मिला चारलवार मॅडम, ॲड. मिलिंद भोंगाडे सर, ॲड. योगेश्वर मंडपे सर आणि ॲड. एम.एच. आवळे साहेबांनी ॲड रोशन बागडे यांचे नाव सूचित केले.
प्रसंगी ॲड. सुचिता डोंगरे, ॲड. शोभा कश्यप, ॲड. नंदिनी धूर्वे, ॲड. मंजुषा नाईक, ॲड. भुवनेश्वर उके, ॲड. यु. व्ही कराडे, ॲड. गौतम हाडके, ॲड. विजय पारकर, ॲड. रवी कोचे, ॲड. विनोद डोंगरे, ॲड. भूपेंद्र सोने, ॲड. सुनील गायकवाड, ॲड. सुबोध देशमुख, ॲड. अरुण तैले, ॲड. मोहन पोटदुखे, ॲड. महेश तायडे, ॲड. प्रकाश राऊत, ॲड. मधुकर इल्लुरकर, ॲड. अभिलाष मोडक व इतर माननिय वकील वर्ग उपस्थित होते.
न्यायालय परिसरात समस्त वकील वर्गातून ॲड. रोशन बागडे यांचे जाहीर समर्थन होत असून सर्व तबक्यातील वकिलांनी दिलेल्या जोरदार समर्थनामुळे येत्या निवडणुकीत ॲड. बागडे हे अध्यक्षपदाचे मजबूत दावेदार असल्याचे दिसून येते.असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे
ॲड. वैभव दहिवले यांनी कळवले.