जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत नंदिनी सोनवणेला सुवर्ण सावित्रीबाई फुले विद्यालयाने केली पाच पदकांची कमाई

Khozmaster
2 Min Read
पहूर गावाच्या शिरपेच्या मानाचा तुरा पहूरच्या क्रीडा क्षेत्रात रचला इतिहास 
 प्रतिनिधी गोकुल सिंग राजपूत जळगाव‌
जिल्हा क्रीडा कार्यालय व जळगाव जिल्हा आर्चेरी असोसिएशन यांच्या संयूक्त विद्यामाने आयोजीत जिल्हास्तरीय शालेय आर्चेरी (धनुर्विद्या ) स्पर्धेत पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई माध्यमिक विद्यालयाने  १ सुवर्ण पदकासह २ रौप्य व २ कांस्य अशी ५ पदकांची भरीव कमाई करत विभाग स्तरावर भरारी घेतली आहे .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाने  पहूरच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे .
 नोव्हेंबर रोजी  यावल तालुक्यातील फैजपूर येथील  डी  .एन .महाविद्यालयात जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा  आयोजित करण्यात आली . या स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून विभागावर निवड झाली आहे .शालेय क्रिडा स्पर्धा गेली तीन वर्षे कोरोना काळात बंद होत्या .या स्पर्धा न  झाल्याने अनेक विद्यार्थी व खेळाडू शालेय क्रीडा स्पर्धांची आतुरतेने वाट पाहत होते  .याच अनुषंगाने या वर्षी घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय शालेय आर्चेरी स्पर्धेत अतिशय उस्फुर्त प्रतिसादात पार पडल्या . या स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या ५ खेळाडूंनी सहभाग घेत आपली क्रिडा कौशल्य दाखवलेली यांनी केली पदकांची कमाई
 नंदिनी रमेश सोनवणे सुवर्ण पदक 🥇
आंकाक्षा बळीराम जाधव रौप्य पदक 🥈
सुमित विजय चौधरी – रौप्य  पदक 🥈
वैष्णवी दत्तू घोंगडे -कास्य मेडल🥉
 वैष्णवी भगवान सोनवणे – कास्य पदक🥉
प्राप्त करून विभागावर निवड झालेली आहे .
त्यांना क्रिडा शिक्षक हरीभाऊ राऊत व जामनेर तालुका आर्चेरी असोसिएशनचे सचिव श्रीकृष्ण चौधरी  यांचे मार्गदर्शन लाभले .यशाबदल संस्थेचे अध्यक्ष  बाबूराव आण्णा घोंगडे मुख्याध्यापिका श्रीमती व्ही . व्ही . घोंगडे  , उपमुख्यध्यापिका के . ए .  बनकर  , वर्ग शिक्षीका एम . एच . बारी , सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे यांच्यासह  शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले . एकाच वेळी जिल्हास्तरावर धनुर्विद्येत पाच पदकांची भरीव कमाई केल्याने शाळेने इतिहास रचला आहे.
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *