प्लास्टीक बंदीवर कायदेशीर कारवाई सोबत जनजागृती आवश्यक

Khozmaster
1 Min Read

मुर्तिजापुर (भुषण महाजन) –

प्रदुषण नियंत्रणासाठी प्लास्टीक बंदी आवश्यक आहे. त्यासाठी कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे मात्र त्यासोबत जनजागृतीवरही भर देण्याबाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले.प्रदुषण नियंत्रण व प्लास्टीक बंदी कारवाई संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. तुषार बावने, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे मनिष होळकर, अनंतनंदाई संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील तसेच प्राणीमित्र आदी उपस्थित होते.जिल्ह्यात व शहरात प्लास्टीक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी सामंजस्य कराराद्वारे स्वयंसेवी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेने कायदेशीर कारवाई करतांना प्लास्टीक वापर बंदी बाबत जनजागृतीही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी दिले असून याबाबत तालुकास्तरावर प्लॉस्टीक बंदीवर कारवाई बरोबर जनजागती होते का ? फक्त कागदोपत्रीच कारवाई होते. याकडे नागरिकांचे लक्ष आहे. प्लॉस्टीकच्या दुष्परिणामाबाबत समाजात जनजागृती झाल्यास त्यामुळे प्लास्टीक वापरापासून लोक परावृत्त होतील, असेही श्रीमती अरोरा यांनी सांगितले.

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *