जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

Khozmaster
2 Min Read

मुर्तिजापुर (स्वप्नील गणगणे)

ग्रामीण भागात युवा कल्याण, सामाजिक व ग्रामीण विकासांकरीता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवा संस्थासाठी  युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार द्वारा अकोला जिल्हातील युवा मंडळाना जिल्हा युवा पुरस्कार देण्याची योजना शासनातर्फे राबविल्या जात आहे. पुरस्काराकरीता युवा मंडळाची निवड करताना त्यांनी केवळ एप्रिल 2021 ते मार्च 2022  कालावधीत केलेल्या कार्याचा विचार करण्यात येईल. जिल्हास्तरावर निवड झालेली संस्था राज्यस्तरीय पुरस्कार निवडीसाठी पाठविण्यात येईल व राज्यस्तरीय निवड झालेल्या संस्थेचा प्रस्ताव राष्ट्रीयस्तरावर निवडीसाठी पात्र राहील.जिल्हास्तरीय पुरस्कार रु. 25 हजार व प्रमाणपत्र, राज्यस्तरीय विजेता संस्थेस रु. 75 हजार व  प्रमाणपत्र तर राष्ट्रीयस्तरीय विजेता संस्थेस प्रथम विजेता रु. तीन लक्ष, व्दितीय एक लक्ष, तृतीय  50 हजार रुपये व मानपत्र प्रदान करण्यात येईल. मंडळांच्या पदाधिकारी यांचे वय 31 मार्च 2020 ला 29 च्या आत असावे, मागील  दोन वर्षात मंडळाने उपरोक्त पुरस्कार प्राप्त केलेला नसावा. तसेच मंडळ नेहरू युवा केंद्राशी संलग्न असणे व सण 2019-2020 चा ऑडिट रिपोट असणे बंधनकारक राहील. जिल्हास्तरीय पुरस्कार 25 हजार रुपये  व प्रमाणपत्र, राज्यस्तरीय विजेता संस्थेस प्रथम 75 हजार रुपये,  द्वितीय 50 हजार रुपये, तृतीय 25 हजार रुपये व प्रमाणपत्र तर राष्ट्रीयस्तरीय विजेता संस्थेस प्रथम विजेतास 3 लक्ष, द्वितीय 1 लक्ष रुपये, तर तृतीय 50 हजार रुपये व मानपत्र प्रदान करण्यात येईल.  मंडळाच्या पदाधिकारी यांचे वय 31 मार्च 2022 ला 29 च्या आत असावे, माघील दोन वर्षात मंडळाने पुरस्कार प्राप्त केलेला नसावा तसेच मंडळ नेहरू युवा केंद्र अकोलाशी संलग्न असणे व सन 2021 – 22 चा ऑडीट रिपोर्ट असणे आवश्यक राहिल.पुरस्काराकरीता आवेदन करणाऱ्या युवा मंडळनी नमुना अर्ज नेहरू युवा केंद्र, वसंत देसाई स्टेडीयम,दुसरा माला, अकोला. ता.जि.अकोला कार्यालयातून दि.7 डिसेंबर 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष येऊन प्राप्त करावा. पूर्ण भरलेले आवेदन पत्र, संस्था नोदणी अधिनियम 1860 नोंदणी पत्र, घटना, वार्षिक अहवाल, फोटो, बातमी व अंकेषण रिपोर्ट दि. 31 मार्च 2022 ला संस्थेच्या पदाधिकारी यांचे वय अन्य आवश्यक कागदपत्रासह दि.12 डिसेंबर 2022 चे आत सादर करून या संधीचा फायदा जिल्ह्यातील युवक मंडळानी घ्यावा, असे आवाहन वित्त व कार्यक्रम पर्यवेक्षक उदय देशमुख यांनी केले आहे.

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *