देऊळगाव माळी येथील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त आय.ए.एस .मिशन IAS अमरावती चे जनक प्रा. डॉ नरेशचंद्र काठोळे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात होते. यावेळी बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले. ग्रामीण भागातील तरुण विद्यार्थी हा नेहमी आपल्या परिस्थितीला दोष देत आपली कुवत ओळखत नाही. व त्याचा परिणाम त्याची आत्मशक्ती नेहमी जास्त असूनही तो पाहिजे ते ध्येय साध्य करू शकत नाही .असे मत त्यांनी मांडले. त्यांनी सोदाहरण कलेक्टर होणे किती सोपे आहे .फक्त स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे हे स्पष्ट करून दाखवले. त्यांच्या संस्थे मार्फत हजारो विद्यार्थी यशस्वी अधिकारी महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या कार्यालयात सेवा देत आहेत. अगदी पहिलीपासून तर पदवीपर्यंत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास किती सुलभपणे करू शकतात याचे स्पष्टीकरण दिले. यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य वि. ए. बाहेकर हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य म.वी. गाभणे, प्रा.सु.वि. काळूसे ,वि.ऊ.राजगूरू हे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बाहेकर यांनी ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षांची आवश्यकता प्रतिपादन केली.गणेश मंडळाचे अध्यक्ष रवी गाभणे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तु.ल.मगर यांनी केले . यावेळी प्रा.संजय जमधाडे ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेची तयारी घेत असल्याबद्दल यांचा प्रा.डॉ. नरेंशचंंद्र काठोळे यांनी सत्कार केला सूत्रसंचालन व आभार अनिल कलोरे यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.