जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे उपस्थितीचे आवाहन .

KHOZ MASTER
2 Min Read
जामनेर नगरीत १८ रोजी भरणार १३ वे जिल्हास्तरीय मराठी  साहित्य संमेलन 
जामनेर
जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे रविवार  डिसेंबर रोजी 13 वे जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ साहित्यिक माया धुप्पड या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.जामनेर येथील एकलव्य माध्यमिक विद्यालयात सकाळी १० वाजता प्राध्यापक वासुदेव  वले , एम . एम . शेठ यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.जामनेर नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष साधनाताई महाजन यासंमेलनाच्या स्वागताध्यक्षा असून अॅड . शिवाजी सोनार जितेंद्र पाटील , दीपक पाटील, डॉ. शिरीष पाटील ,डॉ. अमोल शेठ, पि.के. पाटील, जे.के. चव्हाण, नाना लामखेडे, ताराबाई कोठारी, मोहन भाई पपनानी, चंद्रशेखर पाटील ,डॉ.आशिष महाजन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हे संमेलन होणार आहे .
या संमेलनात राजेश पाटील यांच्या चारोळी संग्रहाचे प्रकाशन होणार आहे .तसेच श्रद्धेय भवरलालजी जैन लिखित ‘ती आणि मी ‘आत्मकथन पर हृदगतावर व्याख्याते ज्ञानेश्वर शेंडे संवाद साधणार आहेत.संमेलनांतर्गत निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून यात जिल्हाभरातील  ४० कवी सहभागी होणार आहेत .समारोपीय सत्रामध्ये जिल्हास्तरीय काव्य लेखन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानपत्र स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवल्या जाणार आहे .ग्रंथ लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाणार असून विजेत्या लेखकांना साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .जिल्हाभरातील कवी नवोदित साहित्यिक वाचक लेखकांनी या संमेलनास उपस्थित राहून साहित्याचा व साहित्यिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर दगडू पाटील, उपाध्यक्ष मधुकर केशव पांढरे, सचिव गोरख रामदास सूर्यवंशी, सहसचिव जितेंद्र रामकृष्ण गोरे, खजिनदार सुखदेव कौतिक महाजन, संचालक प्रतिभा नरवाडे, ज्योती पाटील, विनोद जाधव ,प्रा. शांताराम महाजन, शंकर भामरे ,श्रीकांत पाटील, यांच्यासह सर्व संचालक मंडळाने केले आहे .
0 9 7 1 9 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *