सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील अतिरिक्त ट्रान्सफॉर्म 3.25 चे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते आज उद्घाटन….

KHOZ MASTER
2 Min Read
मागील बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेले अतिरिक्त ट्रान्सफॉर्म आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या पर्यतनाने आज चालू झाले आहे.कडोळी ते 33 के व्ही अंतर्गत कडोळी गारखेडा तपोवन भगवती माझोड गुगळ पिंपरी माहेरखेडा हिवरा केंद्रा खुर्द माझोड अशी गावे आहेत या गावांमध्ये ते 33 के व्ही कडोळी अंतर्गत होणारा विद्युत पुरवठा हा कमी प्रमाणात होत असल्यामुळे या गावातील शेतकरी त्रस्त झाले होते रात्रंदिवस जागून शेतीला पाणीपुरवठा करता येत नव्हता हा विषय आमदार तानाजीराव मुटकुळे यांना माहीत झाल्यावर त्यांनी तात्काळ कडोळी या ठिकाणी अतिरिक्त ट्रान्सफॉर्म उपलब्ध करून आज त्या ट्रांसफार्मर चे लोकार्पण केले आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
उद्घाटनाला मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरीक उपस्थित होते.तसेच हिंगोली जिल्हा विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी पाठपुरावा केल्यामुळे तात्काळ धानोरा(बंजारा) देऊळगाव बटवाडी भगवती या गावांमध्ये नविन 33 के व्ही मंजूर झाले आहेत.आज कडोळी येथील कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भाजपा ज्येष्ठ नेते के के शिंदे प्रशांत सोनी
डॉक्टर रवी पाटील गोरेगावकर मुक्तार देशमुख
 संतोष खोडके माजी सभापती पंचायत समिती सेनगाव रामेश्वर देशमुख शशिकांत देशमुख गजानन नाईक गजानन काळे विश्वनाथ शिरसाठ विलास शिरसाठ राजू जाधव दत्ता लांडगे विष्णू होणे वसंता जाधव कैलास बांगर सुरेश मुळे,नारायणराव मगर,तसेच एम एस सी बी चे अभियंता घुगे साहेब,लोखंडे साहेब पि से देशमुख तसेच सर्व एमएसईबी स्टॉप कार्यक्रमास उपस्थित होते.तसेच पत्रकार बालाजी देशमुख उपस्थित होते.
0 9 7 1 9 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *