समृध्दी माहामार्गावर  फर्दापूर टोल प्लाजावर भाजपा चा जल्लोश

Khozmaster
1 Min Read

सतिश मवाळ मेहकर

देशाचे लोकप्रिय नेते, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.  या लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील फरदापुर टोल प्लाजावर आयोजित केले होते. यावेळी टोल प्लाजावर थेट प्रक्षेपण कार्यक्रमाला भाजप शिवसेना चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तिथ होते.यावेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते सुमारे 75 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले.या लोकार्पण सोहळ्याला बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. प्रतापराव जाधव,भाजपा जिल्हाध्यक्ष आ.मा.ॲड.आकाश दादा फुंडकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. . चैनसुख संचेती,आ.मा.संजय रायमुलकर,आ.मा. सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्यासह भाजपा बाळासाहेबांची शिवसेना युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी  भाजपा जिल्हाध्यक्ष आकाशदादा फुंडकर व आमदार श्वेताताई महाले यांनी मेहकर येथील भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या सोबत चर्चा करताना सांगितले की आपले सरकार असुन तुम्ही आपल्या अडचणी सांगितल्या बरोबर निर्सन केल्या जाईल पदाधिकारी कार्यकर्ते हेच नेत्यांना मोठे करत असुन आपले वर्चस्व त्यांच्या प्रती देत असुन त्यांणा सहकार्य करावे च लागेल व श्वेताताई महाले यांनी यांनी सांगितले मला कधी फोन करा मी माझ्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना मी माझ्या परीने परिपूर्ण सहकार्य करील असे उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांना आश्वासन दिले.तेव्हा भाजपा पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

0 9 4 7 2 6
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *