मुर्तिजापूर ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना व दिव्यांग बेरोजगार संघटना अकोला यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ३ डीसेंबर २०२२ ला जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला यावेळी संघटनेच्या वतीने दिव्यांग रॅली काढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमानंतर संघटनेसाठी विशेष काम करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या . यामध्ये मुर्तीजापूर येथील नूर खा शेर खा यांना दिव्यांग बेरोजगार संघटना मुर्तीजापुर शाखा शहराध्यक्ष पदी नियुक्ती घेण्यात आली यावेळी कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संजय बरडे दिव्यांग बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष सुधीर कडू तसेच अकोला जिल्हा कोषाध्यक्ष दिलीप सरदार ,. सचिव मो अजिज , मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष अनिल सरदार , कर्मचारी संघटना दिव्यांग बेरोजगार संघटना जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखतालूका अध्यक्ष प्रविण फुले , वर्षा माहूरे , आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते . त्यांच्या या नियुक्तीमूळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत असून त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत .
Users Today : 4