चंद्रकांत पाटील यांचेवर तात्काळ गुन्हे दाखल करा – रिपब्लिकन सेनेची मागणी अन्यथा जिल्हाभर आंदोलन छेडू

Khozmaster
2 Min Read
भाई विजयकांत गवई प्रती.चिखली
 तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील महापुरुषांचा एकेरी भाषेत उल्लेख करणे, त्यांच्या विषयी अपशब्द बोलून अपमान करणे व नंतर माफी मागून मोकळे होणे अशी नीच प्रथा सुरू झाली आहे.महाराष्ट्रातील व देशातील काही राजकारणी महापुरुषांच्या विषयी बोलतांना मागचा पुढचा विचार न करता उचलली जीभ लावली टाळूला असेच घडत आहे. छिंदम, राज्यपाल, त्रिवेदी नंतर महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अकलेची तारे तोडत सांगितले की कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली असे बिनडोक पणाचे वक्तव्य केल्याने समाजमन दुखावल्या गेले. सतत महापुरुषांचा होणारा अपमान असह्य होत चालला असून राग अनावर झाल्याने काही तरुणांनी चंद्रकांत पाटलाच्या अंगावर शाही फेकून निषेध केल्याने त्या तरुणांवर ३०७ ,३५५,३५३,२९४,५००,५०१,१२०-B, ३५,७,३७(१), ३७(३)१३५ . विविध कलमा नुसार गुन्हे दाखल करण्यात आले, एका साधारण मंत्र्याच्या अंगावर शाही फेकली तर गुन्हे दाखल होतात तर ज्या महापुरुषांच्या कार्याने देश प्रभावित झाला असून त्यांच्या कर्तृत्वाची छाप जगभर पडली अश्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलावर तत्काळ गुन्हे दाखल करा अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हा भर आंदोलन छेडू असा खणखणीत इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजयकांत गवई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई, जिल्हाध्यक्ष पेंटर संघटना सुरेशभाऊ इंगळे, चिखली शहर अध्यक्ष सुनील सोळंके, चिखली शहर उपाध्यक्ष सतीश पवार, अनिल चव्हाण, दीपक तायडे, प्रदीप हिवाळे, शेख दानिश, विजय इंगळे, गौतम इंगळे, अनिल चव्हाण, सौरभ बावस्कर रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 9 4 7 2 8
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *