कोषागार कार्यालयाचे आवाहन
बुलढाणा,
राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांनी सन 2022-23 या वर्षात आयकर निर्धारण करण्यासाठी बचतीची प्रमाणपत्रे कोषागार कार्यालयात दि. 10 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन कोषागार कार्यालयाने केले आहे.निवृत्तीवेतनधारकांची सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी आयकर निर्धारण करण्यात येणार आहे. त्यासाठी बचतीचा तपशिल सादर करणे आवश्यक आहे. निवृत्तीवेतनधारकांनी बचतीची प्रमाणपत्रे सादर केली नसल्यास उत्पन्नानुसार कर निर्धारण करून टीडीएस कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांनी बचतीचा तपशील, पॅनकार्डची छायांकित प्रत जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे यांनी केले आहे.
Users Today : 15