संदिप ढोरे खंडाळा देवी
महाराष्ट्राचे आराध्यदैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मागील काही दिवसांपासून महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, व चंद्रकांत पाटील उर्फ चंपा सह भाजपाचे नेते सातत्याने चुकीचे वक्तव्य करून त्यांचा व महाराष्ट्राचा घोर अपमान करीत आहेत.राज्यातील शिंदे _ फडणवीस ईडी सरकारवर जनतेचा तिळमात्र विश्वास राहिलेला नसल्याने महाराष्ट्राच्या सिमालगत असलेली अनेक गावे बाजूच्या राज्यात जाण्याची भाषा बोलत आहे. विशेषत: सांगली जिल्ह्य़ातील अनेक गावांनी कर्नाटक राज्यात जाण्याबाबत उघडपणे भूमीका घेतली आहे. हे अत्यंत दुर्दैवी व चिंताजनक आहे. या संदर्भात राज्यसरकारची स्पष्ट भुमिका दिसून येत नसल्याने राज्यातील जनतेच्या मनात तिव्र आक्रोश निर्माण झालेला आहे.
या सर्व बाबींच्या विरोधात महाविकास आघाडीने शुक्रवार दिनांक 16/12/2022 रोजी सकाळी 9.00 वाजता मुकमोर्चाचे आयोजन केले आहे .महाविकास आघाडी यांच्या निर्देशानुसार आपणास कळविण्यात येते की, महाराष्ट्रद्रोही भाजपाच्या विरोधात महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या मुकमोर्ची या आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्ष मोठ्या ताकदीने सहभागी होणार आहे. त्याच बरोबर सर्व घटक पक्ष व संघटना सहभागी होणार आहे तरी मेहकर तालुक्यातील सर्व महाविकास आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.यावेळी महाविकास आघाडीचे किशोर गारोळे,आशीष रहाटे, अँड अनंतराव वानखेडे, देवानंद पवार,सागर पाटील,निसार अन्सारी,घोडे, संदिप ढोरे, विलास चनखोरे, भाई सुखदाने,बळीसर,तेजनकर, देशमुख बापू असे बरेच पदाधिकारी बैठकीत शिवसेना कार्यालय येथे उपस्थित होते.
Users Today : 18