सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
तालुक्यात व सावळरबारा परिसरात प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या लाभापासून पीक विमा भरून नुकसानीची तक्रार केलेले शेतकरी विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे लाभापासून वंचित राहण्याच्या भीतीमुळे हवालदिल झाले असून त्याच या पीक विमा कंपनीला काही सोयरसुतक नसल्याचे चित्र सोयगाव तालुक्यात दिसून येत आहे,
तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीच्या वेळेस ” प्रधानमंत्री फसल विमा योजनेतर्गत पावसाळा सुरु होतांना आपापल्या शेतातील पिकांचा csc सेंटरमध्ये पैसे भरून विमा भरला खरा नंतर सोयगाव तालुक्यातील स्थिती बदलली पावसामुळे पिकांचे नुकसान झाले त्यावेळेस फसल बिमा कंपनीकडून ७२ तासाच्या आत आपल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ” क्रॉप इन्शुरन्स एप वरून शेतकऱ्यांना देण्याचे आव्हाहन शेतकऱ्यांना करण्यात आले, यात बऱ्याच शेतकऱ्यांना लिहिता वाचता येत नसल्याने ऑनलाईन नोंदणीची ताराबळ उडाली तरी हवालदिल शेतकऱ्याने नुकसानीची नोद करून दिली, नंतर पंचनामा करण्याची जबाबदारी कंपनीची असतांना त्यांनी ह्या कामासाठी इतरांना अधिकार दिले त्यांनी शेतकऱ्याच्या पंचनाम्या साठी आर्थिक मागणी करत ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले त्यांचेच पंचनामे केले त्यामुळे बरेच शेतकरी पंचनामे न झाल्यामुळे या लाभापासून वंचित राहिल्याचे कंपनीच्या प्रतिनिधी कडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले, त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी बिमा कंपनीचा विम्याचे पैसे भरून सुद्धा लाभापासून वंचित राहतो काय? या भीतीपोटी सावळदबारा परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे…
Users Today : 7